पश्चिम महाराष्ट्र

'या' गावात पहिलीच्या विद्यार्थ्यांकडे सहा वर्षानंतर 84 हजार प्रश्नोत्तरांची बॅंक असेल

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा)  : विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी आणि त्यातून त्यांचा भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठीचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने मान्याचीवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील गल्ली-बोळांच्या भिंती बोलक्‍या केल्या आहेत. तेथून ये-जा करताना आणि खेळताना भिंतीवरील प्रश्नोत्तरे वाचून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडत असून, त्यातून त्यांचा बुध्यांक वाढण्यासही चांगली मदत होणार आहे. 

लोकसहभागातून राबविलेले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी यामुळे मान्याचीवाडी या सुमारे 500 लोकसंख्येच्या गावाचे नाव दूरवर पोचले आहे. विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे कारभारी, अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांसाठी हे गाव अभ्यास केंद्रच बनले असून, राज्यासह परराज्यातून येथे सहली येतात. त्यामध्ये शैक्षणिक सहलींची संख्या तुलनेत जास्त आहे.

नक्की वाचा - शेतकरी कुटुंबातील किरणचा अचूक वेध;नेमबाजीत विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी

मान्याचीवाडीत अंगणवाडीपासून सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा असून, शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यापासूनच तेथे संगणक ज्ञानावर भर देण्यात आलेला आहे. गावातील विद्यार्थ्यांसह शैक्षणिक सहलीमधून तेथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने नुकत्याच तेथील गल्ली-बोळाच्या भिंती सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे लिहून बोलक्‍या केल्या आहेत. लोकसहभागातून राबविलेल्या या उपक्रमासाठी परिसरातील अनेक पेंटर्सनी महिनाभर मोठी मेहनत घेतली. गावातील छोट्या छोट्या गल्ल्यांतील भिंतींवर केलेल्या लिखाणाची वर्गवारी करण्यात आली असून, अभ्यासक्रमानुसार गणितीय गल्ली, इतिहास गल्ली, सामान्यज्ञान गल्ली अशा प्रकारे गल्ल्यांची ओळख निर्माण केली आहे.

सुटीच्या दिवशी खेळताना तसेच शाळेच्या दुपारच्या सुटीत विद्यार्थी या भिंतीवरील प्रश्नोत्तरांचा अभ्यास करून पाठांतर करतानाही दिसतात. अनेकदा शिक्षकही त्यांच्यासोबत असतात आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधानही करून देतात. अनेक वेगळ्या उपक्रमांनी चर्चेत असलेल्या मान्याचीवाडीतील हा नवा उपक्रमही परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

नक्की वाचा - सज्जनगडावरील अशोकवनास मिळणार संजीवनी

गावातील सार्वजनिक इमारती आणि घरांच्या भिंतीवर सामान्य ज्ञानावर आधारित दोन हजार प्रश्नोत्तरे लिहिली आहेत. दर दोन महिन्यांनी ती बदलण्याचे नियोजन आहे. येथे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेला विद्यार्थी सातवीत जाईल, तेव्हा त्याच्याजवळ 84 हजार प्रश्नोत्तरांची बॅंक तयार असेल. 
रवींद्र माने, सरपंच, मान्याचीवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT