सज्जनगडावरील अशोकवनास मिळणार संजीवनी 

सज्जनगडावरील अशोकवनास मिळणार संजीवनी 

सातारा ः सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामी यांनी सुमारे 400 वर्षांपूर्वी उभारलेल्या श्रीराम मंदिराचे जीर्ण झालेले सभागृह आणि त्यापुढील अशोकवनाचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी रामदास स्वामी संस्थानच्या वतीने 65 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

हेही वाचा -  गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची चमकदार कामगिरी

साताऱ्याच्या पश्‍चिमेस साधारण 17 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे. तसेच त्यांनी उभारलेले समाधी मंदिर आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधण्यात आले असून, मंदिरापुढे सभागृह आहे. या सभागृहाची यापूर्वीही काही प्रमाणात दुरुस्ती केली होती. हे सभागृह बहुतांश लाकडी आहे. सभागृहाला आत प्रकाश व हवा येण्यासाठी मोठ्या खिडक्‍या आहेत. त्याही पूर्ण लाकडी आहेत. त्या अतिशय जीर्ण आणि बऱ्याच अंशी खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्याची दुरुस्ती नव्हे तर त्या पूर्ण बदलण्याची गरज आहे. खिडक्‍या, काही दरवाजे, वरील लाकडी छताची दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. हे काम आता संस्थानच्या वतीने हाती घेतले जाणार आहे. सर्व नक्षीदार खिडक्‍या व लाकूड कामासाठी दर्जेदार सागवान वापरले जाणार आहे. सभागृहात प्रकाश आणि हवा सतत खेळती राहील, याची दक्षता घेतली जाणार आहे.

हेही वाचा -  सज्जनगड : कल्याण स्वामींच्या स्मारकातून मिळणार निष्ठेची प्रेरणा

सज्जनगडावर संस्थानच्या वतीने होणारे भक्तिसंगीत, कीर्तन, प्रवचन तसेच पारायणाचे सर्व कार्यक्रम या सभागृहात होतात. सभागृहाच्या छताला हंड्या, झुंबरे लावून सुशोभित केले जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली.
 या सभागृहापुढे अशोकवन आहे. या मैदानात अशोकाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. मैदानभर गर्द सावली सतत पडत असते. या वनात सर्वत्र खाली दगडी फरशी आहे. उत्सव काळात भाविक मोठ्या प्रमाणात गडावर येतात. त्यावेळी भाविकांना या वनातच प्रसाद दिला जातो. मात्र, मैदानावरील फरशी सखल नाही. सर्वत्र चढ-उतार आहेत. त्यामुळे भाविकांना ते त्रासदायक होते. या ठिकाणी आकर्षक आणि मजबूत फरशी घालून अशोकवन सुंदर केले जाणार आहे. तसेच भाविकांना हात धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी अशोकवनात सुधारित व्यवस्था केली जाणार असल्याचेही श्री. स्वामी यांनी सांगितले.

असाही प्रामाणिकपणा -  हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत

सज्जनगडावर संस्थानच्या वतीने वर्षभर दर्जेदार कार्यक्रम होतात. भक्तिसंगीताबरोबरच कीर्तन, भजन, प्रवचनाचे कार्यक्रम होतात. वादनाचेही कार्यक्रम होतात. त्यामध्ये नामवंत गायक, वादक, कलाकार हजेरी लावतात. त्यामुळे येथील सभागृह आकर्षक, हवेशीर करण्यावर भर दिला जाणार आहे 
- बाळासाहेब स्वामी, अध्यक्ष, श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड  
 सातारा सातारा सातारा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com