Shirala Police Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : माझी बायको कोठे गेली ते सांग म्हणत जावयानं सासूवर केला ब्लेडने हल्ला

जयाने आरडाओरडा केला असता शेजारी जमल्याने प्रवीणने पळ काढला. जखमी जयावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

पत्नी गेल्याचा राग मनात धरून जया व तिचा नातू घरात असताना प्रवीणने तेथे येऊन 'माझी बायको कोठे गेली, ते मला सांग' असे म्हणून सासू जयाबरोबर भांडण काढले.

शिराळा : 'माझी बायको कोठे गेली ते मला सांग,' म्हणत जावयाने येथील सासूवर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली. जया रमेश गायकवाड (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

संशयित जावई प्रवीण महिपती आढाव (अंत्री बुद्रुक, ता. शिराळा) हा हल्ला करून पसार झाला. जखमी गायकवाड यांनी शिराळा पोलिस (Shirala Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना काल सकाळी ११ च्या सुमारास घडली.

शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की गायकवाड शिराळा येथे भाड्याच्या घरात नातू विजयसह राहत आहेत. जया यांची मोठी मुलगी स्वप्ना प्रवीण आढाव ही पती व दोन मुलीसह अंत्री बुद्रुक येथे राहत होती. स्वप्ना दोन मुलींना घेऊन घरात कोणास न सांगता निघून गेली आहे.

प्रवीणने सासू जया यांना स्वप्ना मुलीसह घरातून गेल्याची माहिती आठ दिवसांपूर्वी दिली होती. तिघींचा शोध घेतला असता त्या आढळल्या नाहीत. पत्नी गेल्याचा राग मनात धरून जया व तिचा नातू घरात असताना प्रवीणने तेथे येऊन 'माझी बायको कोठे गेली, ते मला सांग' असे म्हणून सासू जयाबरोबर भांडण काढले. शिवीगाळ केली.

'स्वप्नाचा फोन आला किंवा तिची माहिती मिळाली की मी सांगेन,' असे म्हणताच 'तूच माझ्या घराचा नाश केला,' असे म्हणून प्रवीणने खिशातील ब्लेड काढून जयाच्या दोन्ही हातावर व इतर ठिकाणी वार करून जखमी केले.

जयाने आरडाओरडा केला असता शेजारी जमल्याने प्रवीणने पळ काढला. जखमी जयावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हवालदार सुनील पेटकर अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT