पिंपरी-चिंचवड

युक्रेन मध्ये अडकलेले पुणे-नगर जिल्ह्यातील 12 विद्यार्थी आज सुखरुप पुण्यात दाखल

हंगेरी ते दिल्ली पर्यंतचा प्रवास विमानाने करत सोमवारी (ता. 7) सकाळी 7 वा. हे सर्वजण दिल्लीत पोहचले. पुणे विमानतळावर पोहोचवण्याची सोय केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

हंगेरी ते दिल्ली पर्यंतचा प्रवास विमानाने करत सोमवारी (ता. 7) सकाळी 7 वा. हे सर्वजण दिल्लीत पोहचले. पुणे विमानतळावर पोहोचवण्याची सोय केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.

मोशी - उच्च शिक्षणासाठी (High Education) युक्रेन (Ukraine) मध्ये गेलेले परंतु युक्रेन-रशिया युध्दामुळे (War) अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना (Students) झाप्रोझिया युनिवर्सिटीने पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांना हंगेरी सीमेपर्यंत स्वखर्चाने रेल्वे द्वारे त्यांची सुरक्षित (Secure) पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली.

हंगेरी ते दिल्ली पर्यंतचा प्रवास विमानाने करत सोमवारी (ता. 7) सकाळी 7 वा. हे सर्वजण दिल्लीत पोहचले. पुणे विमानतळावर पोहोचवण्याची सोय केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर नेण्यात आले. तिथे त्यांच्या अल्पोपाहार व भोजन करून थोडा वेळ आरामाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. रात्री 11 वाजता दिल्लीतील विमानतळावरून त्यांना पुण्याकडे रवाना करण्यात आले. विमान प्रवासाची सोय देखील महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. रात्री साधारण 1:20 वाजता हे सर्व विद्यार्थी लोहगाव विमानतळावर पोहचले.

या सर्वांची वाट पहात बसलेले त्यांचे पालक त्यांना पाहताच खूप आनंदी झाले. यात त्या सर्वांचे डोळे भरून आले होते. भारत माता की जय अशा घोषणा देऊन विद्यार्थी विमानतळाबाहेर पडत होते. यात मोशीतील साक्षी सतीश बोराटे ही विद्यार्थ्यीनी देखील होती. तिच्या स्वागतासाठी तिचे वडील सतीश बोराटे, आई सपना बोराटे, भाऊ श्रेयश बोराटे, नगरसेवक व नातेवाईक वसंत बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन साक्षीसह सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी संतोष बोराटे, सचिन बोराटे, प्रकाश गव्हाणे, किरण उढाणे, गणेश पवार, वासुदेव आल्हाट, अभिषेक बोराटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या विद्यार्थ्याच्या युक्रेन पासून सुरक्षित येण्यासाठी त्यांचे गुरु डॉ. महेंद्र झावरे यांनी अपार कष्ट घेतले. मुलांना सुरक्षित आणल्याबद्दल पालकांनी डॉ. झावरे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT