Crime 
पिंपरी-चिंचवड

वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ चक्क तुरुंगात!

मंगेश पांडे

पिंपरी - वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री रस्त्यावर एकत्र जमून कोयता, तलवारीने केक कापून धिंगाणा घातला जातो. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्यास बर्थ डे बॉयचा वाढदिवस कुटुंबीयांसमवेत अथवा मित्रांसह साजरा न होता थेट तुरुंगात साजरा होत आहे. यामुळे शुभेच्छा मिळणे तर दूरच पोलिसांचा दंडुका खाण्याची वेळ येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढदिवस म्हणजे शुभचिंतन करण्याचा दिवस असतो. कुटुंबीयांसह अथवा मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र, आता वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच बदलली आहे. मध्यरात्री एकत्र जमून कोयता, तलवार यासारख्या हत्याराने रस्त्यावर केक कापला जातो. कापलेला केक खाण्याऐवजी बर्थ डे बॉयसह एकमेकांच्या तोंडाला फासला जातो. यातून वादाच्या घटना घडतात. आतषबाजी, घोषणाबाजी करीत मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जातो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

मात्र, मद्याच्या नशेत असलेल्या टोळक्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातही असे प्रकार घडत आहेत. शनिवारी (ता. ५) रात्री दापोडी येथे सोहेल शेख या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचा मित्र समीर सियाज बागसिराज याने आणलेला केक कोयत्याने कापण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावर एका माजी आमदार पुत्राचा वाढदिवस हत्याराने केक कापून साजरा केला होता. या प्रकरणाची जोरदार चर्चाही झाली होती. 

बेकायदा हत्यार बाळगून केक कापणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून दहशत निर्माण केल्यास गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात जाग्यावर जामीन होत नाही. आरोपींना न्यायालयात हजर केल्यास कारागृहात रवानगी केली जाते. 

हत्याराने केक कापून दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा तरुणांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

Young Officer ACB Trap : निवडणूक काळातील बिलासाठी तरूण अधिकाऱ्याने तब्बल ५० हजार लाच घेतली, एसीबीने आवळल्या मुसक्या, जतमधील घटना

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

SCROLL FOR NEXT