PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

प्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना राजकीय हस्तक्षेप टाळण्याचे आव्हान

पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही आयुक्त राजेश पाटील यांनी सुरू केली आहे.

अक्षय साबळे

पिंपरी - महापालिकेच्या (Municipal) आगामी निवडणुकीसाठी (Election) एक सदस्यीय प्रभागरचनेचा (Ward Structure) प्रारूप कच्चा आराखडा (Plan) तयार करण्याची कार्यवाही आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी सुरू केली आहे. त्यासाठी २५ अधिकाऱ्यांची समिती (Officer Committee) नियुक्त केली आहे. मात्र, आराखडा तयार करताना होणारा राजकीय हस्तक्षेप (Political Interference) टाळण्याचे आव्हान प्रशासनासमोर (Administrative) आहे. कारण, २०१७च्या निवडणुकीसाठी झालेल्या प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाला होता. विशेषतः नियमानुसार उत्तरेकडून होणारी प्रभागरचना नागरिकांच्या हरकतींमुळे बदलली होती. त्यामुळे उत्तरेकडचं पहिलं गाव तळवडे चक्क १२ क्रमांकाच्या वॉर्डात सहभागी करावं लागलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आजही रंगते आहे.

महापालिकेची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सध्याची चार सदस्यीय प्रभाग रचना बदलून एक सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचना शहराच्या उत्तरेकडून सुरुवात करायची आहे. तेथून ईशान्येकडे, त्यानंतर पूर्व दिशेकडून पश्‍चिमेकडे येऊन प्रभागरचना करावी. शेवटचा प्रभाग दक्षिणेकडील असावा. त्यानुसार प्रभागांना क्रमांक दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागाच्या सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे क्रमांक नमूद करावेत, असा आदेश समितीला आहे.

शहराचा विचार केल्यास उत्तरेकडे तळवडे गावठाण आहे. तेथून सुरुवात करावी लागेल. चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी असा उत्तरेकडील पट्टा झाल्यावर पूर्वेकडील दिघीपासून पश्‍चिमेकडे रावेत, किवळे, मामुर्डी, पुनावळे, ताथवडेपर्यंत गणना होऊन दक्षिणेकडील दापोडी किंवा जुनी सांगवी शेवटचा प्रभाग असू शकेल. २०१७च्या निवडणुकीसाठी ऑगस्ट २०१६ पासून प्रभागरचना केली, तेव्हा उत्तरेकडील तळवडे गावठाणापासून प्रभागरचना करण्यात आली. मात्र, गावठाणाचा समावेश प्रभाग एकमध्ये व त्याची उपनगरे त्रिवेणीनगर, रुपीनगर, ज्योतिबानगर परिसर प्रभाग बारामध्ये समावेश केला होता. त्यास हरकती आल्याने एक क्रमांकाच्या प्रभागातून तळवडे गावठाण वगळण्यात आले. त्यामुळे चिखली-सानेचौक भागाचा समावेश एक क्रमांकाच्या प्रभागात केला व तळवडे गावठाणासह त्याच्या उपनगरांचा भाग प्रभाग बारामध्ये समाविष्ट केला. याशिवाय, अन्य काही प्रभागांची रचनाही अशीच विचित्र केली होती. उदाहरणार्थ पूर्वी कासारवाडीचा स्वतंत्र प्रभाग होता. २०१७ ला कासारवाडीचा समावेश प्रभाग १० व २० मध्ये करण्यात आला.

प्रभागरचना समितीची जबाबदारी

- प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करणे

- प्रभागरचनेबाबत गोपनीयता राखणे

- नियमांचे काटेकोर पालन करून वेळेत काम पूर्ण करणे

- निवडणूक आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे

- आराखडा तयार होताच ई-मेलने आयोगाला अवगत करणे

प्रभागरचना समितीला सूचना

- प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता पहावी

- नद्या, नाले, टेकड्या, डोंगर, रस्ते, पूल विचारात घ्यावे

- एक इमारत, चाळ, घराचे विभाजन दोन प्रभागात होऊ देऊ नये

- सर्व जागांचा कोणत्या ना कोणत्या प्रभागात समावेश व्हावा

- रचनेबाबत शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

IND vs NZ ODI Squad : निवड समितीच्या डोक्यात काय शिजतंय? जसप्रीत बुमराहचा वन डे संघात समावेश अनिश्चित, दुखापत की आणखी काही कारण? Inside Story

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT