कोकणात जायचंय! दुसरा डोस हवाय

गणेशोत्सवासाठी दरवर्षी शहरातील हजारे कोकणी भाषिक मूळगावी जातात. परंतु यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच कोकणात मिळणार प्रवेश.
Corona vaccination
Corona vaccinationSakal

पिंपरी - गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) दरवर्षी शहरातील हजारे कोकणी (Konkan) भाषिक मूळगावी जातात. परंतु यावर्षी कोरोनाच्या (Corona) सावटामुळे लसीचे दोन डोस (Dose) घेतलेल्या प्रवाशांनाच (Passenger) कोकणात प्रवेश (Entry) मिळणार आहे. परिणामी, कोकणवासियांकडून आरोग्य केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गर्दी होत आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहर पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले होते. मात्र, आता रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोकणात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचे आगमन या साऱ्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तीला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान ७२ तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

Corona vaccination
केंद्र सरकारचे गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान

तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी त्या व्यक्तिची चाचणी केली जाणार आहे. यावेळी चाचणी पॉझिटिव्ह आल्यास व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीला मात्र यामधून सूट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे शहरातील कोकणवासीयांचा मूळगावी जाण्यासाठी दुसरा डोस घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. काहींना ८४ दिवस पूर्ण झाले नाहीत, त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेत आहेत.

आज मोफत तपासणी शिबीराचे आयोजन

१८ वर्षाखालील मुलांना काही अडचण येणार नाही. मात्र ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ व जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी (ता. १) मोफत आरटीपीसीआर तपासणी करून रिपोर्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली.

Corona vaccination
ग्रामीण मार्गांवरील बसमार्गामुळे प्रवास सुखकर

शहरातील कोकणवासियांचे मते

‘माझा कोरोना लसीचा पहिला डोस झाला आहे. मला सावंतवाडीला जायचं आहे. उद्या दुसऱ्या डोसची तारीख आहे.’

- रामचंद्र तावडे, काळेवाडी ( सावंतवाडी )

‘राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटीपीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी कोकणात यायला परवानगी मिळेल.’

- दीपक सांवत, नेहरूनगर (कणकवली)

‘गावी जाण्यासाठी उत्साही आहे. पण दुसरी लस वेळेत मिळाली, तर निर्विघ्न गणेशोत्सवाला जाऊ शकतो.’

- महादेव बागवे, कासारवाडी (मालवण)

‘गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी पाहता आपणच आपली काळजी घेतलेली बरी. माझे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. गावी जाता येईल.’

- बाळा गुरव, अजमेरा कॉलनी (देवगड)

‘कोरोनाची दुसरी लस वेळेत मिळाली, तर ठीक अन्यथा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवता येईल.’

- भास्कर साळवी, मासुळकर कॉलनी (रत्नागिरी)

आकडे बोलतात

- शहरातील कोकणीवासिय लोकसंख्या - ७० हजार

- दरवर्षी कोकणात जातात- १० हजार

- दरवर्षी जाणारी बुकींग बस संख्या - ८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com