cylinder 
पिंपरी-चिंचवड

हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे आचारी गंभीर जखमी   

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : हॉटेलच्या स्वयंपाकगृहातील गॅस शेगडीचा पाईप खराब झाल्याने त्यातून गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाला. या घटनेत आचारी गंभीर जखमी झाला. पाईप खराब झाल्याबाबत हॉटेलमालकाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करीत कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची काळजी न घेता निष्काळजीपणा केल्याप्रकरणी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

अभिजीत चंदू फुले (वय 34, रा. काळेवाडी फाटा) असे या घटनेत जखमी झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेलमालक अमरसिंह अहुजा व सुखवीर अहुजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचे पिंपळे निलख येथील विशालनगर येथे हॉटेल असून, येथे फुले हे आचाऱ्याचे काम करतात. हॉटेलच्या स्वयंपाकगृहातील गॅस शेगडीचा पाईप खराब असल्याबाबत त्यांनी हॉटेलमालकाला कल्पना दिली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. 

दरम्यान, 7 ऑगस्टला फुले हे हॉटेलमध्ये काम करीत असताना अचानक शेगडीचा पाईप निघाला. त्यामधून गॅसगळती झाल्याने आगीचा भडका उडाला. यामध्ये फुले यांच्या हाताला व पायाला भाजल्याने गंभीर दुखापत झाली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके नागपुरात आंदोलन करणार, तारीख ठरली; परवानगीची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

SCROLL FOR NEXT