election sakal
पिंपरी-चिंचवड

विद्यमानांची प्रतिष्ठा पणाला; उमेदवार संख्यावाढीसह चुरस दिसणार

महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत प्रभागाचे क्षेत्र पाव भागच राहणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत अधिकाधिक वेळा उमेदवार पोहोचू शकणार आहेत. मात्र, एकटाच उमेदवार असल्यामुळे कार्यकर्त्यांवर मदार ठेवून प्रचार करावा लागणार असून विद्यमानांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने अधिक गर्दी व चुरस दिसेल.

महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपणार असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे स्पष्ट केले आहे. २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली. त्यामुळे प्रभागांचे क्षेत्र विस्तारलेले आहे. एका प्रभागात तीन-तीन गावांचा समावेश आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यास उमेदवारांची दमणूक झाली.

महापालिका निवडणूक

शिवाय, ते राहात असलेल्या परिसराबरोबरच नवख्या भागात जाऊन प्रचार करणे व मतदारांशी संपर्क साधणे अवघड जात होते. परिणामी, आपापल्या पॅनेलमधील सहकारी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत संपर्क साधण्यावर भर द्यावा लागला होता. अनेक ठिकाणी संपर्क कार्यालये सुरु करावी लागली होती. आता एक सदस्य पद्धतीने प्रभागाचे क्षेत्र कमी होणार असल्याने सर्वांनाच प्रचारासाठी सोयीचे होणार आहे. पण, मतदारांच्या गाठी-भेटी घेताना व त्या भेटींचे रूपांतर मतदान करताना प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

आजपासून वॉर्डरचना कार्यवाही

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना सूचना केली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून (ता.. २७) शहरातील वॉर्ड रचनेची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यासाठी २०११ ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्‍चित केली जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

IND vs NZ ODI Squad : निवड समितीच्या डोक्यात काय शिजतंय? जसप्रीत बुमराहचा वन डे संघात समावेश अनिश्चित, दुखापत की आणखी काही कारण? Inside Story

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT