Jyotsna Shinde Sakal
पिंपरी-चिंचवड

महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रायगडला बदली

पिंपरी महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांची जिल्हा रायगडमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली करण्यात आली.

आशा साळवी

पिंपरी - महापालिका (Municipal) शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे (Jyotsna Shinde) यांची जिल्हा रायगडमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली (Transfer) करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण, शालेय साहित्य वाटपातील अनियमितता या प्रकरणामूळे कायम त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. गेल्या महिन्यापासून त्यांच्या बदली करण्याबाबत प्रशासकीय हलचाली सुरू होत्या.

ज्योत्स्ना शिंदे ह्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी म्हणून २६ मे २०१८ मध्ये रूजू झाल्या होत्या. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ डिसेंबर २०१७ मध्ये शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांच्या बदलीच्या रिक्त झालेल्या जागेवर शिंदे त्यांची नियुक्ती केली होती. पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक म्हणून शिंदे यांनी काम पाहिले. आता राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात आरोपी शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका त्यांच्यावर होता. शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पालिकेत हजेरी लावणा-या अधिकारी शिंदे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुजू करून घेतले. त्यांनी महापालिका कामकाजात देखील अफरातफर केल्यावरून त्यांच्या संपूर्ण कामकाजाची आणि त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी करण्याची मागणी काही राजकीय संघटनांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Oman Gas Pipeline : अरबी समुद्राखालून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस! 3000 मीटर खोलीवर 2000 किमीची पाईपलाईन; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

Dadar Accident: हॅण्डब्रेक काढताच बस भरधाव सुटली; चालकाचा धक्कादायक दावा, तांत्रिक बिघाड की मानवी चूक? दादर बस दुर्घटनेचं गूढ वाढलं

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

TET Student : टीईटीसाठी उमेदवारांची संख्या सहा लाखांच्या पार; गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वा लाखाने वाढली नोंदणी

नंदिनीच्या बाळाला दुसरीच बाई जन्म देणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; नेटकरी संतापले- इतका फालतूपणा...

SCROLL FOR NEXT