esakal | पिंपरी ; गरीब घरातील मुलांसाठी ऑनलाइन गुरू’ ॲप
sakal

बोलून बातमी शोधा

Online Education

पिंपरी ; गरीब घरातील मुलांसाठी ऑनलाइन गुरू’ ॲप

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - गरीब घरातील विद्यार्थ्यांना (Students) देखील महागड्या प्रमाणे दर्जेदार शिक्षण (Education) सहज उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेच्या तंत्रस्नेही उपशिक्षक संदीप वाघमोरे यांनी वेबसाइट (Website) पाठोपाठ आता ऑनलाइन गुरू’ (Online Guru) या ॲपची (App) निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध असून आता एका क्लिकवर इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकाचा अभिनव उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

महापालिकेच्या जाधववाडी कन्या शाळेत वाघमोरे उपशिक्षक आहेत. त्यांनी गेल्यावर्षी कोरोनामुळे पारंपारिक अध्यापनाची सवय असल्याने ऑनलाइन अध्यापन करताना अनेक शिक्षकांना अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, कारण शिक्षण थांबल्यास विद्यार्थी या प्रवाहातून बाहेर जातील अशी भीती निर्माण झाली होती. शिक्षकांना ऑनलाइन अध्यापन करणे सोयीचे व्हावे त्यांना ई-लर्निंग घटक शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हावे व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवता येईल याकरिता ‘www.sandeepwaghmore.in/elearning’ ही वेबसाइट सुरू केली. वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ई लर्निंग साहित्य पोहोचवता आले. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मध्ये ‘https://sandeepwaghmore.in/online-guru-an-educational-app’ हे ॲप इन्स्टॉल असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सातत्याने त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचा घटक एका क्लिकवर उपलब्ध होईल. त्यांना इतरत्र कोठेही लिंक शोधण्याची सर्च करण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थ्यांना कमी वेळ मोबाईलची उपलब्ध असल्याने ॲपमुळे उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग अभ्यासाकरिता करता येऊ शकतो, त्यामुळे या ॲपची निर्मिती केल्याचे वाघमोरे सांगतात. महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी ऑनलाइन गुरू’ शैक्षणिक ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा: शिक्षकदिन तीन दिवसावर ! यंदा महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला?

ॲप मध्ये समाविष्ट बाबी

- ई लर्निंग व्हिडिओ - सेमी सह सर्व विषयांचे ई-लर्निंग व्हिडिओ

- ऑनलाइन टेस्ट - १ ली ते १० वी विद्यार्थ्यांचे विषय निहाय उपलब्ध

- आजचा घरचा अभ्यास - दररोज सकाळी ७.०० वाजता उपलब्ध होतो.

ॲपची वैशिष्ट्ये

- एका ॲपवरून एकाच घरातील विद्यार्थी अभ्यास करू शकतात.

- सुरवातीला एकदा इयत्ता सिलेक्ट करा.

- दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.

- एका क्लिकवर विद्यार्थी इयत्ता बदलू शकतात .

- आकर्षक व विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊनकरून डिझाईन केलेली रंगसंगती

- विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व मोबाईलच्या उपलब्धतेनुसार घरचा अभ्यास करू शकतात .

- ऑडिओ, इमेजेस, व्हिडिओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर

- ऑनलाइन टेस्टनंतर मिळालेले गुण लगेच कळणार .

- विद्यार्थ्यांना घरच्या अभ्यासाची नोटिफिकेशन दररोज मिळणार

- शिक्षक पालक विद्यार्थी खालील लिंक वर क्लिक करून हे ॲप विषयी माहिती

- मार्गदर्शक व्हिडिओ पाहू व अ‍ॅप डाऊनलोड इन्स्टॉल करू शकतात.

अशी आहे वेबसाइट

गेल्या दीड वर्षापासून संदीप वाघमोरे या वेबसाइटवर शालेय कामकाज सांभाळून सातत्याने काम करून ९७०० पेक्षा अधिक पोस्ट तयार केलेल्या आहेत. आज पर्यंत या वेबसाइटवर १ कोटी पेक्षा अधिक पेज व्हिवूज झालेले असून इयत्ता पहिली ते दहावीचे १००० पेक्षा अधिक ई लर्निंग व्हिडिओ, १५० पेक्षा अधिकऑनलाइन टेस्ट उपलब्ध आहेत. दररोज सकाळी ७ वाजता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकही दिवसाची सुट्टी न घेता लॉकडाउनपासून आज पर्यंत ई लर्निंग व्हिडिओ व त्यावर आधारित असणारे प्रश्न असा अभ्यास दिला जातो.

loading image
go to top