Pimpri : आनंदोत्सवाची आज सांगता 
पिंपरी-चिंचवड

Pimpri : आनंदोत्सवाची आज सांगता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दहा दिवस मनोभावे भक्ती केल्यानंतर रविवारी (ता. १९) लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रात मूर्ती विसर्जनाला मनाई असल्याने महापालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहे. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी महापालिकेसह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

गणरायाचे वाजत-गाजत घरी आगमन झाल्यानंतर दहा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पूजा व सेवा झाली. आता जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी प्रथेनुसार दीड दिवस तसेच पाच, तीन, सात, नऊ व अनंत चतुर्दशी या दिवशी गणरायाला निरोप दिला जातो. यामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा महत्त्वाचा मानला जात असून, सर्वत्र मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूक मुख्य आकर्षण असतात. शहरातही भव्य स्वरूपात मिरवणुका असतात. चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीतील शगुन चौक येथे मंडळांकडून विविध कार्यक्रम साजरे केले जात. शिस्तबद्ध रांगेत एक-एक मंडळ पुढे सरकत असते. मंडळांकडून सादर होणारे कार्यक्रम पाहण्यासाठी येथे भाविक मोठ्याप्रमाणात गर्दी करतात. ‘गणपती बाप्पाऽ मोरया, मंगलमूर्तीऽ मोरया’ असा जयघोष सुरू असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने उत्सव साजरा होत आहे.

विसर्जन मिरवणुकीसह नदीपात्रात मूर्ती विसर्जनालाही मनाई आहे. त्यामुळे शहरातील सर्व विसर्जन घाटांवर बॅरिकेड लावण्यात आले असून, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली आहेत.

पोलिसांची कुमक अशी...

विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असेल. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून दोन पोलिस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, ६३ पोलिस निरीक्षक, ७९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक , ८०८ कर्मचारी, १२६ गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात असतील. नदीघाटासह मुख्य चौकात बंदोबस्त तैनात राहणार असून, गस्तही वाढविण्यात आली आहे. नाकाबंदीही केली जाणार आहे.

१०७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी घरीच मूर्ती विसर्जन करण्याबाबत महापालिकेने आवाहन केले आहे. नदीपात्रात मूर्ती विसर्जनास मनाई असल्याने विसर्जन घाटावर बॅरिकेड लावण्यासह सुरक्षा व्यवस्थाही तैनात आहे. ज्यांना घरी विसर्जन करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी नदीघाटासह ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली आहेत. महापालिकेतर्फे शहरात १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. यासाठी स्वतंत्र सजविलेले रथ तयार केले असून, त्याठिकाणी त्याची व्यवस्था केली आहे. सर्व गणेशभक्तांनी या ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती देण्यासह हा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेसह लोकप्रतिनिधी व सोसायटींनीही कृत्रिम हौद व मूर्ती संकलन केंद्र उभारली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT