Pimpri-Chinchwad sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad :रोडरोमियोंचा धिंगाणा ;विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड

शाळेच्या आवारात तसेच परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबलेली असतात.

सकाळ वृत्तसेवा

काळेवाडी: परिसरात रोडरोमिओंनी धिंगाणा घातला असून, येथील मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेस, कॉलनीच्या प्रवेशाजवळ व चाळींच्या आवारात उभे राहून विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोंमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

काळेवाडी परिसरात अनेक शाळा-महाविद्यालय असून, अनेक क्लासही आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमियोंच्या छेडखानीला सामोरे जावे लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शाळेच्या आवारात तसेच परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबलेली असतात.

त्यातील काही मुलांचा शाळा अथवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसतो. मात्र, येथे येणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्यासाठी व त्यांना त्रास देण्यासाठी ही मुले घोळक्याने येथे थांबतात.

येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणे, घाणेरडे हावभाव करणे, टोमणे मारणे, छेडछानी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कोणी जाब विचारला तर हे टोळके जाब विचारणाऱ्यालाच मारहाण करतात.

रोडरोमियो या ठिकाणी विनाकारण गाड्यांवर येऊन वेगवेगळ्या प्रकारचे बाईक स्टंट करणे, मोठमोठ्याने आरडाओरड करणे हे सततचे झाले आहे.

हे रस्त्याने जाणाऱ्या मुलींना कट मारतात. यात अनेकदा अपघात होऊन विद्यार्थिनी, महिला व लहान मुले जखमी झाली आहेत.

या सर्व प्रकारांमुळे नागरिक, महिला व मुलींमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून अनेक मुली शाळा महाविद्यालयात यायला तयार होत नाहीत. तर महिलाही या त्रासाने वैतागल्या आहेत. याविषयी पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

यासाठी शाळा महाविद्यालयाच्या आवारात तसेच मुख्य चौकांमध्ये एक पोलिस पथक नियुक्त करावे. या रोडरोमियोंना जरब बसावी, यासाठी अशा टवाळखोरांना झोडपून त्यांची धिंड काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टवाळखोर मुले गाड्या सुसाट चालवितात. कर्कश हॉर्न वाजवतात, वाकड्यातिकड्या गाड्या चालविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा बेशिस्तांवर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. या बाबत पोलिसांना सांगितल्यास, तुम्हीच फोटो काढून पाठवा, असे पोलिस सांगतात.

हरेश नखाते, नागरिक

नागरिकांनी निर्भीड होऊन ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. तत्काळ पोलिस कर्मचारी त्याठिकाणी पोचतील. अशा टवाळखोरांची गय केली जाणार नाही. तसेच नागरिकांचे नावही गुप्त ठेवले जाईल.

गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT