Woman Kidnapping : महिलांच्या अपहरणांत २२ टक्के वाढ

महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत न्यायालयातून सुनावणी पूर्ण होऊन गुन्हे सिद्ध झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत.
woman kidnapping
woman kidnappingsakal

- पांडुरंग म्हस्के

मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे राज्यकर्ते सांगत असले, तरी महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे गृह विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना सर्वाधिक आहेत. तर, गेल्या तीन वर्षांत महिलांविरोधातील नोंदलेल्या गुन्ह्यांची संख्या १७,८८५ एवढी आहे.

महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत न्यायालयातून सुनावणी पूर्ण होऊन गुन्हे सिद्ध झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत. न्यायालयात ३३ गुन्ह्यांची सुनावणी पूर्ण झाली. त्यातील २८ जण निर्दोष सुटले. फक्त पाच जणांना शिक्षा झाल्याचे या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा होणार आहे. त्यावेळी या मुद्द्यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

गृह विभागाचा गुन्हेगारी विषयक अहवालामध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंग, छेडछाड, हुंडाबळी, अमलीपदार्थ, बनावट नोटा अशी सर्वच आकडेवारी असून राज्याची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुलींचे अपहरण अधिक

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील चार वर्षांत तान हजार ४८७ महिलांचे अपहरण झाले. त्यामध्ये १८ वर्षांखालील तीन हजार ४५९ मुली आहेत.

बालिकांवरील अत्याचारांमध्ये गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध कच्च्या दुव्यांमुळे गुन्हेगार मोकळे सुटत असल्याचे दिसून येते.

अत्याचारात वाढ

महिलांवरील अत्याचाराच्या संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यात २०२१ अखेरच्या तुलनेत २०२२मध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये जून २०२२अखेरच्या तुलनेत जून २०२३मध्ये दोन टक्क्यांनी घट झाली. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जून २०२२ अखेर जून २०२३ अखेर २८९ गुन्ह्यांची घट झाली पण, अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com