Electricity
Electricity Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सांगवी वर्षभरात तब्बल ४०५ वेळा अंधारात

सकाळ वृत्तसेवा

औंध - सांगवी परिसरात जेसीबी व इतर यंत्राद्वारे सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या खोदकामात भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या गेल्या वर्षभरात तब्बल ४०५ ठिकाणी तुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वीजग्राहकांना वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मार्च महिन्यात महावितरणची उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी खोदकामात तोडल्यामुळे महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे सांगवी उपविभागातील १ लाख ९० हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या सर्वच सातही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला होता. हे रोहित्र बदलण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला. या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून भागात चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले होते.

सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सांगवीमधील पीडब्लूडी ग्राऊंडवर कोविड रुग्णालय लवकरच उभारले जाणार आहे. मात्र, खोदकामात वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सुरू राहिल्यास या रुग्णालयासह सांगवीमधील इतर रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. पिंपरी विभाग अंतर्गत सांगवी उपविभागात वाकड, ताथवडे, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, विशालनगर, थेरगावचा काही परिसराला वीजपुरवठा केला जातो. मागील वर्षी १ एप्रिलपासून आतापर्यंत या परिसरात महावितरणच्या उच्चदाबाच्या ७४ आणि लघुदाबाच्या ३३१ भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तोडण्यात आल्या आहेत. या भागात रस्त्याचे रुंदीकरण, पाण्याचे व ड्रेनेजचे पाईपलाइन्स, खासगी कंपन्यांचे केबल्स टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे.

दरम्यान, आतापर्यंत एकूण सात प्रकरणांमध्ये महावितरणकडून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीजविक्रीमध्ये नुकसान

महावितरणला कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. सोबतच ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा भूमिगत वाहिनी तोडली जात असल्याचेही प्रकार दिसून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT