esakal | गरजू रुग्णालयांना मिनी व्हेंटिलेटर; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू रुग्णालयांना मिनी व्हेंटिलेटर; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा पुढाकार

पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा उपक्रम; कोरोना रुग्णांसाठी ठरणार अधिक उपयोगाचे

गरजू रुग्णालयांना मिनी व्हेंटिलेटर; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा पुढाकार

sakal_logo
By
बाबा तारे

हिंजवडी : पुणे पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनने गरजू रुग्णालयांना दहा मिनी व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. पवना हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. अनंत सूर्यवंशी म्हणाले, ‘‘विशेष म्हणजे हे मिनी व्हेंटिलेटर पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून हिंजवडीतील यशिका इनफॉरट्रॉनिक या स्टार्टअप कंपनीने बनवला आहे. कोरोना रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर उपयोगाचे आहे. असोसिएशनने दिलेल्या दहा पैकी दोन मिनी व्हेंटिलेटर पवना हॉस्पिटल मावळ यांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. हा मिनी व्हेंटिलेटर रुग्णांची गरज लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी खूप उपयोगी आहे. यामुळे रुग्णांना हे फायदेशीर ठरणारा आहे.’’ आतापर्यंत दोन मिनी व्हेंटिलेटर्स पवना रुग्णालयास देण्यात आले असून, उर्वरित व्हेंटिलेटर शहरातील काही गरजू रुग्णालयास देणार आहेत.’’

हेही वाचा: खाकी वर्दीतली माया! आईच्या मृत्यूनंतर 2 दिवस उपाशी बाळाला महिला पोलिसांनी भरवला घास

‘‘पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनने दिलेल्या दहा मिनी व्हेंटिलेटरद्वारे प्रती महिना कमीत कमी पन्नास ते साठ कोरोना रुग्णांचा जीव वाचणार आहे. ही खूप समाधान कारक बाब आहे. एक मिनी व्हेंटिलेटर हे दोन लाखांना असून, एकूण दहा मिनी व्हेंटिलेटरची किंमत वीस लाख आहे. हे मिनी व्हेंटिलेटर मोफत देण्यात येणार आहे.’’

- सागर रुकारी, उपाध्यक्ष, पुणे पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशन

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्गाला लागत आहे ब्रेक

उपक्रम आदर्शवत

नातेवाइकांची व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी धावपळ करतात. तर काहींना शेवटच्या टप्प्यात बेड मिळूनही जीव गमवावा लागतो. कमी खर्चातील या मिनी व्हेंटिलेटर्समुळे किमान काही रुग्णांना यातून दिलासा मिळणार आहे. पुणे पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनचा हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा आहे.

loading image