पिंपरी-चिंचवड

रावेत पंपिंग स्टेशन चौकात फांद्यांमुळे सिग्नल दिसेनासा

CD

रावेत, ता.२४ : रावेत पंपिंग स्टेशन चौकात झाडाच्या फांद्यांमुळे वाहतूक नियंत्रक दिवे पूर्णपणे झाकले गेले आहेत. त्याने
वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊन चौकात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या चौकातील दिव्यांवरील फांद्यांची तातडीने छाटणी होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर त्याची कार्यवाही केल्यास अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्त करत आहेत.
वाहनचालक रमेश वाघमारे म्हणाले, ‘‘दिवे अगदी शेवटच्या क्षणी दिसतात. त्यामुळे वाहन थांबवावे की नाही, हे समजत नाही. त्यामुळे वाहने एकमेकांना धडकणे, अचानक ब्रेक लागणे अशा घटना वारंवार घडत आहेत.’’
स्थानिक रहिवासी जयश्री काळघे म्हणाल्या, ‘‘या चौकातून शाळेची वाहने, दुचाकी आणि मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जातात. वाहतूक नियंत्रक दिवे दिसत नसल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उभा राहतो आहे.’’

रावेत पंपिंग स्टेशन चौक वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळील फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत.
- बापू गायकवाड, दळणवळण विभाग, महापालिका

NGI25B00888

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Bonus: मोदी सरकारकडून सर्वात मोठी भेट! कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर, पण कुणाला? जाणून घ्या...

IND vs PAK: हॅरिस रौफ, फरहानच्या वादग्रस्त सेलिब्रेशनला शाहीन आफ्रिदीचा फुल सपोर्ट; म्हणाला, भारताविरुद्ध तर...

'या' दिवशी भेटीला येणार अक्षय केळकरची 'काजळमाया'; 'देवमाणूस'ची पत्नीही मुख्य भूमिकेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Stock Market Closing: शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी विक्री

Nashik News : नाशिकमध्ये मराठी भाषा संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय ग्रंथालय होणार; भूखंडाला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT