पिंपरी-चिंचवड

गोडाऊन फोडणाऱ्या पाच जणांना अटक

CD

वडगाव मावळ, ता. ३० : टाकवे बुद्रूक औद्योगिक वसाहतीमधील बंद गोडाऊन फोडून त्यातील सुमारे साडे नऊ लाख रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या पाच स्पोर्टस बाईक चोरून नेणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद करण्यात वडगाव पोलिसांना यश आले आहे.
हरिदास सीताराम चवरे (वय ३० वर्षे, रा. टाकवे बु. मूळ रा.भटसांगवी ता. जि. हिंगोली), परशुराम दिगंबर सरडे (वय ३१, रा. अहिरवडे फाटा, मुळ रा. इंगळकी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), तुफैल अलीम खान (वय २१, रा.अहिरवडे फाटा, मुळ रा.खमहरिया ता. उतरौला, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश), इमरान रिझवान खान (वय २५, रा. अहिरवडे फाटा, मूळ रा. खमहरिया, ता. उतरीला, जि.बलरामपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून इटली बनावटीच्या बेनेली कंपनीच्या पाच स्पोर्टस बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेला एक महिंद्र कंपनीचा पिकअपही जप्त करण्यात आला आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार जून २०२२ मध्ये चोरट्यांनी टाकवे बुद्रूक येथील औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित उद्योगपतीच्या मालकीचे व युनियन बँकेच्या ताब्यात असलेल्या सिलबंद गोडावुनचा दरवाजा तोडून आतील विदेशी बनावटीच्या पाच नवीन स्पोर्टस बाईकची चोरी केली होती. याप्रकरणी बँकेचे अधिकारी दीपक कुमार ताराचंद (रा. हडपसर, पुणे) यांनी गेल्या वर्षी (ऑगस्ट २०२२) फिर्याद दिली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये विशेष लक्ष घालून तपास पथक गठित केले होते. अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील जावळे, सचिन गायकवाड, श्रीशैल कंटोळी, संजय सुपे, सचिन काळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सचिन काळे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे लक्षात घेऊन तसेच त्याठिकाणी सुरक्षेची कोणतीही आधुनिक साधने नसल्याचा गैरफायदा घेऊन गुन्हा केल्याचे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे उद्योजकांनी आपल्या गोडावूनच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम या सारख्या आधुनिक सुरक्षाविषयक साधनांचा अवलंब करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT