Dr Shripal Sabnis Sakal
पिंपरी-चिंचवड

मराठवाड्यातील शिक्षित वर्गाने संघटित व्हा - डॉ. सबनीस

‘मराठवाडा हा खरा अर्थाने तेव्हा मुक्त होईल जेव्हा असाक्षरता, गरीबी, सामाजिक, पाण्याचा विकासाच्या समस्या पासून मुक्ती मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘मराठवाडा हा खरा अर्थाने तेव्हा मुक्त होईल जेव्हा असाक्षरता, गरीबी, सामाजिक, पाण्याचा विकासाच्या समस्या पासून मुक्ती मिळेल. त्यासाठी सर्व मराठवाड्यातील शिक्षित वर्गाने संघटित होऊन मराठवाड्यातील सर्वांगीण विकास प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भोसरी येथील अराईज इंटरनॅशनल स्कूल व मराठवाडा मित्रमंडळ परिवार यांच्या संयुक्‍त विद्यमाने ७४ व्या मराठवाडा मुक्‍तीदिन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश व १९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सबनीस होते. पुणे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष डॉ.भाऊसाहेब जाधव, माजी गटनेते एकनाथ पवार उपस्थित होते. यावेळी अरुण पवार(वृक्षमित्र पुरस्कार), श्रीराम हांडीबाग(उद्योजक पुरस्कार), संजू राम माने(कोरोना योद्धा पुरस्कार), प्रा.डॉ. गजानन वाव्हळ (समाज प्रबोधनकार), सुनील जाधव (सामाजिक पुरस्कार), दत्तात्रेय इंगळे (समाजसेवा पुरस्कार) यांना ‘मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी आमदार कव्हेकर म्हणाले, ‘‘भारत देश स्वतंत्र्य झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्या प्रमाणात मात्र मराठवाड्याचा विकास झालेला नाही. त्यासाठी मराठवाड्याच्या नेतृत्वाने कुठलाही प्रयत्न केलेला नाही. परिणामी मराठवाडा हा दुष्काळवाडा झालेला आहे. यासाठी मराठवाडा विकास मंडळाची स्थापना करून तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे.’’

पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘निजामशाहीची जुलमी राजवट सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व अनेक स्वातंत्र सेनानी यांच्या अथक परिश्रमाने व बलिदानाने मोडून काढली. ह्या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे.’

प्रास्ताविक इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन चौगुले यांनी तर आभार प्राचार्य जितेंद्र खैरनार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT