पिंपरी : घरबसल्या लायसन्स काढण्यात अनेक अडचणी

रहिवासी, आधार लिंकसह नावातील दुरुस्तीमुळे फेटाळले जातात अर्ज
पिंपरी : घरबसल्या लायसन्स काढण्यात अनेक अडचणी
पिंपरी : घरबसल्या लायसन्स काढण्यात अनेक अडचणी

पिंपरी : लॉकडाउनमुळे नागरिकांना घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अर्ज भरताना दिलेली माहिती आणि आधार कार्डावरील प्रत्यक्ष माहिती यात तफावत येत असून, हजारो अर्ज अद्यापही पडून आहेत. परिणामी शहर, बाहेरगावच्या आणि परराज्यातील हजारो कामगारांनी अर्ज करूनही ते निकाली लागलेले नाहीत.

ऑनलाइनच्या किचकट प्रक्रियेमुळे दोन-दोन महिने अर्ज करूनही परवाना मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना आधारवरची माहिती अद्ययावत करताना पूर्ण विराम किंवा अनुस्वार चुकला, तरी अर्जाची पडताळणी होत नसल्याचे अनेकांनी सांगितले. छोटी जरी चूक असली, तरी अर्जात एरर येतो. शेवटी आरटीओ कार्यालयात जाऊनच चौकशी करावी लागत आहे. त्यामुळे आधार कार्डावरील माहिती आणि परवानासाठी अर्ज करताना भरलेली माहितीत तफावत असल्याने हजार अर्ज पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा भरावा लागतो अर्ज

ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्डाला मोबाईल क्रमांक लिंक असावा. आधारावरील सर्व माहिती न चुकता भरावी लागते. ऑनलाइन अर्ज भरताना ‘सन ऑफ’ असा रकाना आहे. त्यानुसार आधार कार्डवरही ‘सन ऑफ’ किंवा ‘यांचा मुलगा’ अशा पद्धतीने अर्जावर नोंद असणे आवश्यक आहे. तेव्हाच अर्ज स्वीकृत होऊन परवाना संबंधित पत्त्यावर पाठविण्यात येतो.

काय आहे पर्याय

ज्यांना अशा स्वरूपाच्या अडचणी आल्या आहेत, त्यांनी पाठविलेल्या अर्जात दुरुस्ती करून अर्ज भरावे. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे, अशा उमेदवारांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन संबंधित विभागाला कळविल्यास त्यांच्याकडूनही दुरुस्ती करण्यात येऊ शकते, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

पिंपरी : घरबसल्या लायसन्स काढण्यात अनेक अडचणी
दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अर्जदार म्हणतात...

नीलेश चौधरी (नोकरदार) : मी शिकाऊ परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, मला अजूनही वाहन परवाना मिळाला नाही. माझ्या आधार कार्डवर पुण्याचा पत्ता आहे. त्यामुळे मला स्थानिक पत्ता दिल्यावरच परवाना मिळेल, असे सांगण्यात येत आहे. ’’

सुजाता जाधव, (शिक्षिका) : ‘‘मी शिक्षिका असून वर्षभरापूर्वी नाशिक येथून शहरात माझी बदली झाली आहे. मी ऑनलाइन अर्ज करूनही मला अद्याप परवाना मिळाला नाही. माझ्यासारख्या अनेक जणांच्या अडचणी आहेत. यावर तोडगा निघून परवाना मिळावा. ’’

‘‘सर्व माहिती ऑनलाइन भरूनच परवाना दिला जातो. अचूक माहिती भरल्यावरच परवाना मिळतो. मोबाइलला आधार लिंक असेल तर तत्काळ ओटीपी मिळतो. ओटीपी नसल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. ज्यांना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचणी येत आहेत. अशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन सुधारणा करायची आहे. त्यातील त्रुटी दूर करण्यात यातील. ’’

-अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चिखली- मोशी

‘‘ऑनलाइन अर्ज करूनही अनेकांना परवाना मिळालेला नाही. हे टाळण्यासाठी सुटसुटीत प्रक्रिया असावी, जेणेकरून लोकांना अडचण येणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या या योजनेत सोयीपेक्षा अडचणीच जास्त येत आहेत. शहराबाहेरील नागरिकांना अडचण येत आहे. ’’

- अनंत कुंभार, उपाध्यक्ष राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com