Ed Sheeran esakal
Premier

Ed Sheeran: एड शीरनही झाला 'मिसळ प्रेमी'; स्वत: बनवली झणझणीत मिसळ, व्हिडीओ व्हायरल

Ed Sheeran: एड शीरननं भारताची लोकप्रिय डिश मिसळ पाववर ताव मारला.विशेष बाब म्हणजे एड शीरननं स्वत: मिसळ बनवली.

priyanka kulkarni

Ed Sheeran: हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एड शीरन (Ed Sheeran) हा काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत एड शीरनचं कॉन्सर्ट झालं. तसेच एड शीरन हा मुंबईत विविध सेलिब्रिटींनी देखील भेटला. एड शीरननं त्याच्या भारत दौऱ्यादरम्यान मुंबईतील अनेक गोष्टी एक्सप्लोअर केल्या. एड शीरननं भारताची लोकप्रिय डिश मिसळ पाववर देखील ताव मारला. विशेष बाब म्हणजे एड शीरननं स्वत: मिसळ बनवली.

एड शीरननं शेफ संज्योत कीरसोबत मिसळ बनवली. Your Food Lab या युट्यूब चॅनलवर एड शीरन आणि शेफ संज्योत कीर यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते दोघे मिसळ तयार करताना दिसत आहेत. मिसळ बनवण्यासोबतच एड शीरन आणि शेफ संज्योत कीर यांनी भारतीय खाद्य संस्कृती, भारतीय सिनेमा, संगीत या विषयांवर चर्चा केली.

Your Food Lab या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसले की, एड शीरन हा त्यानं बनवलेली मिसळ त्याच्या चाहत्यांना खायला देतो. तसेच एड शीरन स्वत: देखील मिसळ खातो. शेफ संज्योत कीर एड शीरनला विचारतो, "मिसळ खूप तिखट आहे का?" यावर एड शीरन म्हणतो, "तिखट नाही, खूप टेस्टी आहे"

एड शीरननं नुकताच त्याच्या भारत दौऱ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एड शीरनच्या भारत दौऱ्याचे काही खास क्षण दिसत आहेत. या व्हिडीओला एड शीरननं कॅप्शन दिलं, "भारत दौऱ्याचा एक राऊंड! मी इथे परत येण्याची वाट पाहत आहे."

पाहा व्हिडीओ:

पहिल्यांदाच गायलं पंजाबी गाणं

मुंबईतील कॉन्सर्टमध्ये एड शीरननं पहिल्यांदाच पंजाबी गाणं गायलं. दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर मुंबईतील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ शेअर केला.या व्हिडीओमध्ये दिलजीत आणि एड शीरन हे दोघे 'तेरा नी मैं लव्हर' हे गाणं गाताना दिसले.

कॉन्सर्टमध्ये एड शीरन आणि दिलजीत दोसांझ एकत्र लाइव्ह परफॉर्म करताना पाहून अनेक सेलेब्स आणि प्रेक्षक देखील आनंदी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT