Ed Sheeran, Diljit Dosanjh
Ed Sheeran, Diljit Dosanjhesakal

Ed Sheeran: एड शीरननं पहिल्यांदा गायलं पंजाबी गाणं; दिलजीतनं शेअर केला मुंबईतील कॉन्सर्टमधील खास व्हिडीओ

Ed Sheeran: एड शीरन आणि दिलजीत यांच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Published on

Ed Sheeran: हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एड शीरन (Ed Sheeran) हा गेल्या काही दिवसांपासून भारत दौऱ्यावर आहे. काल रात्री (16 मार्च) एड शीरन आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांचे कॉन्सर्ट मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे पार पडले. दोघांच्या कॉन्सर्टला त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली. एड शीरन आणि दिलजीत यांच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामधील एका व्हिडीओमध्येएड शीरन हा पंजाबी गाणं गाताना दिसत आहे.

दिलजीतनं शेअर केला व्हिडीओ

नुकताच गायक दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर मुंबईतील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीत आणि एड शीरन हे दोघे 'तेरा नी मैं लव्हर' हे गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडीओला दिलजीतनं कॅप्शन दिलं, "भाऊ पहिल्यांदा पंजाबी गाणं गात आहे."

एड शीरननं देखील कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "दिलजीत दोसांझ आज रात्री मुंबईत आला, मी पहिल्यांदा पंजाबीत गाणे गायलं. मी भारतात खूपच चांगला वेळ घालवत आहे." कॉन्सर्टमध्ये दोन्ही टॉप गायकांना स्टेजवर एकत्र परफॉर्म करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एड शीरन आणि दिलजीत एकत्र परफॉर्म करणार आहेत हे कॉन्सर्टच्या आधी कोणालाच माहीत नव्हते. एड शीरनने अचानक दिलजीतला स्टेजवर बोलावून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले.एड शीरनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एड शीरन हा दिलजीतला स्टेजवर बोलवताना दिसला.

पाहा व्हिडीओ:

Ed Sheeran, Diljit Dosanjh
Ed Sheeran in Mumbai : जग गाजवणारा ED शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ...

एड शीरन आणि दिलजीत दोसांझ एकत्र लाइव्ह परफॉर्म करताना पाहून अनेक सेलेब्स देखील आनंदी झाले. दिलजीतनं शेअर केलेल्या कॉन्सर्टच्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच दिलजीतनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Ed Sheeran, Diljit Dosanjh
Ed Sheeran Shah Rukh Video : 'जॉन सीना' नंतर 'एड शिरन' लाही पडली शाहरुखची भुरळ! 'त्या' व्हिडिओतून किंग खानला सलाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com