Akkalkot sakal
Premier

Akkalkot: राणा दा आणि पाठक बाई झाले स्वामींच्या चरणी लीन, शेयर केले खास फोटो

Swami Samartha: दोघांच्या लग्नाला मनोरंजनविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते.

सकाळ वृत्तसेवा

Hardik Joshi and Akshaya Deodhar | हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेत हार्दिकने राणादा; तर अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती.

मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी आजही ही जोडी लोकप्रिय आहे. हार्दिक आणि अक्षयाने मालिका संपल्यावर वैयक्तिक आयुष्यात लग्नगाठ बांधली. हे दोघेही अनेक ठिकाणी फिरायला जात असतात.

एवढेच नव्हे, तर ही जोडी देवदर्शनालासुद्धा जाते. काही दिवसांपूर्वीच हार्दिक-अक्षया सप्तश्रृंगी गडावर देवदर्शनासाठी गेले होते. आता ते अक्कलकोटला पोहोचले आहेत. तिथे त्यांनी स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घेतलं.

राणादाने या मंदिर परिसरातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून ‘श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन’ असं कॅप्शन दिलं आहे. या दोघांच्या फोटोवर नेटकऱ्यांनीदेखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, मालिकेच्या सेटवर चांगली मैत्री झाल्यावर खऱ्या आयुष्यात राणादाने पाठकबाईंच्या थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली होती.

त्यानंतर गुपचूप साखरपुडा उरकत या जोडप्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पुढे, हार्दिक-अक्षयाने डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला मनोरंजनविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT