Kangana Ranaut esakal
Premier

Kangana Ranaut: कंगनानं प्रचारासाठी कंबर कसली, मंडीत केला रोड शो, भाषणातून काँग्रेसवर हल्लाबोल

Kangana Ranaut: कंगनानं काल (29 मार्च) मंडी येथे भव्य रॅलीचे आयोजन केलं होतं.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही हिमाचल (Himachal) प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तिला भाजपचं तिकीट मिळालं आहे. कंगनानं प्रचाराचा नारळ फोडला आहे. कंगनानं काल (29 मार्च) मंडी येथे भव्य रॅलीचे आयोजन केलं होतं. तसेच तिनं मंडीमध्ये आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण देखील केलं. या भाषणातून तिनं काँग्रेसवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना कंगना रनौत म्हणाली, "तुम्ही येथे मोठा मेळावा पाहू शकता. येथे बरेच लोक आले आहेत. मंडीची मुलगी, मंडीतील आवाज होऊन या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करेल याचा सर्वांना अभिमान आहे. या निवडणुकीत भाजपसाठी विकास हाच मुख्य मुद्दा आहे. मंडीतील जनता त्यांच्या मनात काय आहे ते दाखवून देईल."

काँग्रेसवर कंगनाचा हल्लाबोल

भाषणामध्ये कंगना म्हणाली, "मंडीतून मला उमेदवारी देण्यात आली ही गोष्ट काँग्रेसला खटकली. ते घाणेरडे राजकारण करू लागले. त्यांचे नेते राहुल गांधी हिंदूंमधील शक्ती नष्ट करण्याविषयी बोलतात. त्यांच्या प्रवक्त्यांनी मंडीतील महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. मंडीचे नाव ऋषी माडव यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. मंडी म्हणजे ऋषी पराशर यांनी तपश्चर्या केलेले ठिकाण. मंडी दरवर्षी 'महाशिवरात्री'ला सर्वात मोठा 'मेळा' आयोजित करते आणि ते मंडीतील महिलांबद्दल अशी काँग्रेसचे नेते अपमानास्पद टिप्पणी करतात. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करता?"

कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती कंगनानेच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT