Kangana Ranaut : कंगना रणावत यांच्यावरील टिपणी भोवली, पक्षाने कापलं तिकीट...

Kangana Ranaut Mandi Loksabha : अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांच्यावर केलेली टिपणी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना चांगलीच भोवल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बुधवारी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीमधून श्रीनेत यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
Kangana Ranaut Mandi Loksabha
Kangana Ranaut Mandi Loksabhaesakal

Kangana Ranaut Mandi Loksabha : अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांच्यावर केलेली टिपणी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना चांगलीच भोवल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बुधवारी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. या यादीमधून श्रीनेत यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

सुप्रिया श्रीनेत या महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढविणार होत्या. मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या असल्या तरी यंदाही त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्‍चित होते.

यादरम्यान भाजपने मंडी येथून कंगना राणावत यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीची सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खिल्ली उडविताना आक्षेपार्ह भाषेत टिपणी केली. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी आणि सामान्य नागरिकांनीही काँग्रेस व श्रीनेत यांच्यावर जोरदार टीका केली.

Kangana Ranaut Mandi Loksabha
Eknath Shinde Candidate List : कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक, बुलडाण्यात संजय गायकवाडांनी अर्ज भरला, पण तिकीट जाधवांना; शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर

बॉलिवूडमधील कंपूशाहीला जाहीर विरोध करणाऱ्या आणि प्रसंगी राजकीय नेत्यांवरही बिनधास्त टीका करणाऱ्या कंगना यांनी त्यांच्यावरील या टिपणीला संयमी उत्तर दिले होते. तसेच, महिला सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी श्रीनेत यांच्यावरही टीका केली होती. या सर्व प्रकारामुळे श्रीनेत यांच्याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसने महाराजगंजमधून श्रीनेत यांना तिकीट नाकारताना वीरेंद्र चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली.

Kangana Ranaut Mandi Loksabha
RCB vs KKR Playing 11IPL 2024 : आरसीबीच्या होम ग्राऊंड खेळताना केकेआर बदलणार का आपली रणनिती अन् प्लेईंग 11

निवडणुकीच्या काळात आणि विशेषत: उमेदवारी जाहीर होण्याच्या कालावधीत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त भाषेत टिपणी केल्यामुळे उमेदवारीवर पाणी सोडावे लागण्याची यंदाच्या निवडणुकीतील ही पहिलीच घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com