Premier

Vicky & Katrina : कतरीना-विकीचा नवा व्हिडीओ व्हायरल ; नेटकऱ्यांनी पापाराझींची केली कानउघाडणी

अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशलचा नवा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यावरून नेटकऱ्यांनी पापाराझींची कानउघाडणी केलीये.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी कतरीना सध्या प्रेग्नेंसीच्या अफवेमुळे चर्चेत आहेत. विकी आणि कतरीना लंडनमध्ये रस्त्यावर फिरत असताना त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आणि त्यामुळेच त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगू लागल्या.

या व्हिडिओला व्हायरल होऊन आठवडा होतो न होतो तोच त्यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यातील कतरीनाच्या रिअॅक्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावरील पापाराझींच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कतरीना आणि विकी हातात हात घालून रास्ता ओलांडताना दिसत आहेत. तेव्हाच कतरिनाचं लक्ष कॅमेऱ्याकडे जातं कुणीतरी आपला व्हिडीओ काढतंय हे तिच्या लक्षात येतं आणि ती विकीला रस्ता ओलांडण्यापासून थांबवते आणि ते दोघेही मागे फिरतात असं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांनी केली पापाराझींची कानउघाडणी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी पापाराझींची चांगलीच कानउघाडणी केली आहे. "कतरीना खूप प्रायव्हेट व्यक्तिमत्व आहे. तुम्ही तिला का त्रास देताय?","'सेलिब्रिटीज पब्लिक इंटरेस्ट आहेत, पब्लिक प्रॉपर्टी नाही.","त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा." अशा अनेक कमेंट्स लोकांनी कतरीना आणि विकीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर केल्या आहेत.

प्रेग्नेंसीची चर्चा

या आधी कतरीना आणि विकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ते दोघे हातात हात घालून लंडन फिरत होते. त्यावेळी कतरिनाच्या ड्रेसवरून ती प्रेग्नेंट आहे असं वाटत होतं. त्याच्या काही जवळच्या सूत्रांनी कतरीना लंडनमध्येच डिलिव्हरी करणार असल्याचं म्हंटलं. त्यातच तिचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात तीच पोट दिसत होतं. त्यामुळे त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला.

दरम्यान विकी-कतरीनाच्या टीमने या निव्वळ अफवा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नात त्यांना यश आलं नाही. याबाबत विकी आणि कतरीनाकडून कोणतंच स्पष्टीकरण आलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT