Katrina & Alia working together : बंद केलेल्या प्रोजेक्टची पुन्हा सुरुवात; कतरीना, प्रियांका आणि आलिया दिसणार पहिल्यांदाच एकत्र

अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर पुन्हा एकदा त्याने दोन वर्षांपूर्वी थांबवलेला 'जी ले जरा' या सिनेमावरील काम पुन्हा सुरु करणार आहे.
Katrina & Alia working together
Katrina & Alia working togetherEsakal

सध्या स्त्रीप्रधान सिनेमांची चलती आहे. बॉलिवूडमध्ये गाजलेला 'क्रू' असेल किंवा मराठीतील गाजलेला 'बाईपण भारी देवा' किंवा 'नाच गं घुमा' सिनेमा असेल आतापर्यंत रिलीज झालेल्या अनेक स्त्रीप्रधान सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

काही महिन्यांपूर्वी आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरीना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या जी ले जरा सिनेमाची घोषणा झाली होती पण काही कारणास्तव हा सिनेमा थांबवण्यात आला होता. पण आता या सिनेमाबाबत महत्त्वाची अपडेट शेअर करण्यात आली आहे.

पिंकव्हीला या वेबसाईटने शेअर केलेल्या बातमीनुसार, फरहान अख्तर आणि त्याची निर्मिती संस्था एक्सेलची टीम त्यांनी बंद केलेला प्रोजेक्ट 'जी ले जरा' वर पुन्हा काम करायला सुरुवात करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,"प्रॉडक्शन सूर होण्यापूर्वीच हा सिनेमा स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी स्क्रिप्टवर काम सुरु होतं. या सिनेमाची निर्मिती काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती पण हा सिनेमा कॅन्सल केला नव्हता. या सिनेमाशी जोडल्या गेलेल्या सगळ्यांचा-निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांचा हा लाडका प्रोजेक्ट आहे. तारखांच्या प्रॉब्लेममुळे सिनेमाचं काम थांबवण्यात आलं होतं. या सिनेमाची स्क्रिप्ट आता पूर्ण झाली असून याच बंद झालेलं काम पुन्हा लवकरच सुरु होणार आहे.

Katrina & Alia working together
Priyanka chopra: 2,800 तासांची मेहनत अन् 140 वर्षांचा इतिहास; देसी गर्ल प्रियांकानं परिधान केलेल्या खास नेकलेसची किंमत माहितीये?

"टायगर बेबी आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या यादीत या सिनेमाचं नाव आहे. दिल चाहता है पासून सुरु झालेली त्यांची मैत्रीवर आधारित सिनेमांवरील सिरीज त्यांना पूर्ण करायची असून त्यातीलच हा एक सिनेमा आहे. काही काळापूर्वी प्रियांका भारतात परत आली होती त्यावेळी तिने फरहानची भेट घेतली. त्यांनी पुन्हा जी ले जरा या सिनेमावर चर्चा केली. आलिया आणि कतरीनासुद्धा या चर्चेत सहभागी होत्या. ते तिघेही जण आता सध्या तारखांची जुळवाजुळव करण्यात बिझी आहेत आणि यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक गोष्ट घडेल अशी आशा आहे." अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०२१ मध्ये फरहानने या सिनेमाची घोषणा केली होती पण नंतर काही ना काही कारणांमुळे या सिनेमाचं काम थांबत राहिलं पण आता पुन्हा एकदा या सिनेमाचं काम सुरु होईल आणि तो पूर्ण होईल अशी आशा चाहत्यांच्या मनात आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरीना कैफ एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

Katrina & Alia working together
Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com