Ranbir Kapoor And Rishi kapoor esakal
Premier

Ranbir Kapoor And Rishi kapoor:...म्हणून रणबीरनं खाल्ला होता ऋषी कपूर यांचा मार; स्वत:च सांगितला किस्सा

Ranbir Kapoor And Rishi kapoor: द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये रिद्धिमा, नीतू कपूर आणि रणबीर यांनी ऋषी कपूर (Rishi kapoor) यांच्या आठवणींना उजाळा दिला.

priyanka kulkarni

Ranbir Kapoor And Rishi kapoor: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) या कॉमेडी शोला सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) द ग्रेट इंडियन कपिल शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आई नीतू कपूर (Neetu Singh) आणि बहीण रिद्धिमा कपूर यांच्यासोबत हजेरी लावली. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये रिद्धिमा, नीतू कपूर आणि रणबीर यांनी ऋषी कपूर (Rishi kapoor) यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी रणबीरनं त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगितला.

रणबीरनं सांगितला किस्सा

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये रणबीर म्हणाला, मी एकदाच पप्पांचा खूप जोरात मार खाल्ला होता. एकादा आरके स्टुडिओमध्ये दिवाळीची पूजा होती. पप्पा खूप धार्मिक होते. मला वाटतं मी तेव्हा साधारण 8-9 वर्षांचा होतो.तेव्हा मी चुकून चप्पल घालून मंदिरात गेलो. मला तेव्हा पप्पांनी टपली मारली होती."

लग्नानंतर बदलला रणबीर?

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कपिल शर्माने नीतू कपूर यांना विचारले की,'लग्नानंतर रणबीर कपूर बदलला आहे का?'या प्रश्नाचं उत्तर देताना नीतू कपूर म्हणाल्या, "लग्नानंतर रणबीर बदलला आहे, तो एक चांगला माणूस बनला आहे. तो नात्यांना पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व देतो."

रणबीरची बहीण रिद्धिमा म्हणाली, "राहाच्या जन्मानंतर रणबीर अधिक प्रेमळ झाला आहे."

ऋषी कपूर यांचे 2020 मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. ऋषी कपूर यांनी अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलं.

रणबीरने एप्रिल 2022 मध्ये आलिया भट्टशी लग्न केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये आलिया आणि रणबीर हे आई-बाबा झाले. आलियानं मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरनं त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं ठेवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT