shreya bugde  sakal
Premier

Shreya Bugde: तू निलेश साबळेसोबत का गेली नाहीस? श्रेया बुगडेने सांगितली तिची बाजू, म्हणते- प्रत्येकाने स्वतंत्र निर्णय...

Shreya Bugde On Nilesh Sable: लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने मुलाखतीत तिच्या करिअरबद्दलच्या निर्णयांवर भाष्य केलं आहे.

Payal Naik

Shreya Bugde Open Up About Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तर तिच्या वेगवेगळ्या कलाकारांच्या मिमिक्रीने तर चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. तिने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर तिने काही काळ ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमात न जाण्याचं कारण सांगितलं आहे. आपल्याला हिंदी कार्यक्रमाची देखील ऑफर होती असं ती म्हणाली आहे.

'चला हवा येऊ द्या' नंतर निलेश कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात दिसला. त्यात भाऊ कदम, ओंकार भोजने यांची एंट्री झाली. तर कुशल बद्रिके हिंदी कार्यक्रमात गेला. तू निलेश साबळेसोबत का गेली नाहीस असा प्रश्न विचारल्यावर श्रेया म्हणाली, '’चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर प्रत्येकाने स्वतंत्रपणे निर्णय घेतले. मी झी मराठी वाहिनीबरोबर कॉन्ट्र्ॅक्टमध्ये होते. त्यामुळे मी निलेशच्या शोमध्ये जाऊ शकले नाही. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर सगळ्यांनाच एक ब्रेक होता. या ब्रेकमध्ये काय काय करायचं ते ठरवलं. या काळात मला एक हिंदी शोसाठी देखील विचारण्यात आलं. तो देखील मी केला नाही.'

पुडझे श्रेया म्हणाली, 'कारण मला वाटलं की, खरंच मला एका ब्रेकची गरज होती. लगेच तशाच भूमिका करणं हे माझ्याकडून होणारं नव्हतं. त्यासाठी मी रिफ्रेश झालेली नव्हते. तेव्हा मी विचार केला की, त्या ठिकाणी गेल्यावरही मी काही नवीन करू शकणार आहे का? की पुन्हा तसंच काही करणार आहे. त्यामुळे थोडा काळ थांबून पुन्हा नव्याने नवीन पात्र किंवा काम करावंस वाटलं किंवा काहीच नाही तर किमान कोऱ्या पाटीने तरी मला काम करायचं होतं त्यामुळे मी तो ब्रेक घेतला.' श्रेयाने नुकतंच दादर येथे तिचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT