पाणी पुरवठा
पाणी पुरवठा esakal
पुणे

Pune News : समान पाणी पुरवठा योजनेच्या पुर्णत्वासाठी उजडणार २०२६

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे- शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील एक वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मात्र, लष्कर केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील काम पूर्ण होण्यास २०२६ उजडणार आहे.

या भागात ३५९ किलोमीटर लांबी जलवाहिनी टाकली जाणार आहे, त्यापैकी आत्ता केवळ ४२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर एकही मीटर बसवलेले नाही. त्यामुळे समान पाणी पुरवठा योजनेच्या विलंबाचा नवा विक्रमच होणार आहे.

शहरात असमान पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेने २४५० कोटी रुपयांची समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. २०१७ ला या योजनेचे काम सुरू झाले असले तरी प्रशासकीय दिरंगाई, नगरसेवकांचे असहकार्य आणि कोरोना यामुळे २०२२ अखेर पर्यंत ६० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करू असा दावा केला जात आहे. पण या योजनेच्या भाग चारचे काम पूर्ण होण्यासाठी २०२६ उजाडणार आहे.महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी शहराचे पाच भाग केले होते. त्यातील भाग एक, दोन तीन आणि पाच या चार भागाचे काम सुरू आहे.

पण भाग चारचे काम वेळेत न केल्याने महापालिकेने या संबंधित ठेकेदार कंपनीला दंड ठोठावून काम काढून घेतले. याविरोधात कंपनीने लवादात याचिका दाखल केली. त्यामध्ये महापालिकेच्या विरोधात निकाल दिल्याने दंड माफ करून पुन्हा काम सुरू करण्याचे आदेश दिले. या वादात सुमारे अडीच वर्ष भाग चारचे काम झाले नाही.

आता एप्रिल २०२२ पासून काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या नऊ महिन्यात २५ झोनपैकी पैकी एका झोनचे काम पूर्ण झाले आहे.खराडीतील १८ किलोमीटरची जलवाहिनी

खराडीभागात पीपीपीद्वारे रस्ते केले जाणार आहेत. एकदा रस्ते केल्यानंतर पुन्हा जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्याची नामुष्की येऊ नये यासाठी पाणी पुरवठा विभागातर्फे खराडी भागात १८ किलोमीटरचे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. भाग चारमध्ये लष्कर पाणी पुरवठा केंद्राचा भाग येतो.

त्यामध्ये पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या भागाचा समावेश होते.

भाग चारमध्ये असे होणार काम

  • एकूण खर्च ४१५ कोटी

  • जलवाहिन्यांची लांबी - ३५९ किलोमीटर

  • नव्याने टाकलेली जलवाहिनी - ४२ किलोमीटर

  • बसविण्यात येणाऱ्या मीटरची संख्या - ४९०४४

  • कामाची मुदत - एप्रिल २०२२ पासून ४८ महिने

  • पाण्याच्या टाक्यांची संख्या -२१

या बद्धलची प्रतिक्रिया...

‘‘समान पाणी पुरवठा योजनेच्या भाग चारचे काम जैन एरिगेशनकडे आहे. यामध्ये कंपनी लवादात गेल्याने काम होऊ शकले नव्हते. आता पुन्हा नव्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात खराडीत १८ किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार आहे. हडपसर, कोंढवा, खराडी या भागातील योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन वर्ष लागणार आहेत.’’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai North West Loksabha Result: ईशान्य मुंबईत कीर्तिकरांनी उडवला विजयाचा गुलाल; 2000 मतांनी केला वायकरांचा पराभव!

Maharashtra Lok Sabha Election Results Live : सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा १ लाख १ हजार १९४ मतांनी विजय

Maval Constituency Lok Sabha Election Result : मावळमधून संजोग वाघेरे पराभूत, श्रीरंग बारणेंचा दणदणीत विजय

India Lok Sabha Election Results Live : तीनशेचा आकडा गाठता गाठता भाजपच्या नाकी नाकी नऊ! इंडिया आघाडीची मोठी कामगिरी

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT