Corona Patients Sakal
पुणे

पुणे : बुधवारी शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा दोनशेचा आकडा पार

पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा दोनशेचा आकडा बुधवारी (ता.२९) पुन्हा एकदा पार झाला आहे. बुधवारी दिवसभरात शहरात २३२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा दोनशेचा आकडा बुधवारी (ता.२९) पुन्हा एकदा पार झाला आहे. बुधवारी दिवसभरात शहरात २३२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे - पुणे शहरातील (Pune City) दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा (Corona Patients) दोनशेचा आकडा बुधवारी (ता.२९) पुन्हा एकदा पार झाला आहे. बुधवारी (Wednesday) दिवसभरात शहरात २३२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा हा आकडा १०४ दिवसांच्या (साडेतीन महिने) खंडानंतर बुधवारी पुन्हा दोनशेहून अधिक झाला आहे. दरम्यान, दिवसभरात पुणे जिल्ह्यात ४०४ नवे कोरोना सापडले आहेत.

याआधी १६ सप्टेंबर २०२१ ला पुणे शहरात दिवसात २१५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून दिवसातील हा आकडा सातत्याने कमी कमी होत गेला होता. गेल्या महिनाभरापासून कधी पन्नास तर कधी १०० च्या आत शहरातील नवीन रुग्णसंख्या आली होती. साडेतीन महिन्याच्या खंडानंतर काल (मंगळवारी) पहिल्यांदाच शहरातील रुग्णसंख्या ही १७१ झाली होती. त्यात आज (बुधवारी) आणखी ६१ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात एकूण ४०४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांत शहरातील २३२ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७२, नगरपालिका हद्दीत १२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान,दिवसात २२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ८३, पिंपरी चिंचवडमधील ६८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६१, नगरपालिका हद्दीतील १२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT