पुणे : प्रवेश लांबल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ | Scholarship | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

पुणे : प्रवेश लांबल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झालेली नसल्याने अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले नसल्याने हे विद्यार्थी पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचे अर्ज (Application) भरण्यासाठी २८ जानेवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार होती, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

महापालिकेतर्फे इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये समाज विकास विभागातर्फे महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाल्यास १५ हजार व बारावी एवढेच गुण मिळाल्यास २५ हजार रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळांमधील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ६५ टक्क्यांची आहे.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडीत यंत्रणा सज्ज

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवीच्या प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून वैद्यकीय पदवी प्रवेशाची नीटचे प्रवेश अजून सुरूच झाले नाहीत. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना महापालिकेच्या योजनेसाठी अर्ज भरता आलेला नाही, त्यामुळे आता २८ जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. आत्तापर्यंत या योजनेसाठी ११ हजार ०९१ अर्ज आले आहेत. शिष्यवृत्तीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात २१ कोटीची आहे, अशी माहिती मोळक यांनी दिली.

Web Title: Scholarship Pune Corporation Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsScholarship