bed. 
पुणे

पुणे : कोरोना रुग्णांसाठी ८१ हजार खाटा

जिल्हा प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेची तयारी; लहान मुलांसाठी ६ हजार १६५ बेड राखीव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाची (corona) संभाव्य तिसरी लाट आल्यास रुग्णांना उपचारासाठी खाटा (बेड) कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ८१ हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. (81,000 beds for corona patients pune)

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने आतापासून खबरदारी घेण्यासाठी हे नियोजन केल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत सांगितले. नियोजित एकूण खाटांपैकी लहान मुलांसाठी ६ हजार १६५ खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत घ्यावयाची खबरदारी आणि जिल्हा व पालिका प्रशासनाकडून केलेल्या पूर्वतयारीची माहिती त्यांनी घेतली. राव यांनी कोरोनाबाबतच्या आकडेवारीचे या वेळी सादरीकरण केले.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २१९ कोविड केअर सेंटर (सीसीसी), ६१५ समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि ६४ समर्पित कोविड रुग्णालयांत (डीसीएच) या खाटांची सोय केली जाणार आहे. पुणे शहरात ९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. सध्या दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र, येत्या ऑॅगस्टनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे नियोजन केले आहे.

'जगातील काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. आपल्याकडे हा धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले असून लहान मुलांच्या उपचारासाठी खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत,' असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Vidarbha FDA Raids : वर्ध्यात ‘पतंजली’ सुपर मार्टवर छापा, तर यवतमाळमध्ये पान टपऱ्यांवर कारवाई; विदर्भात FDA ची धडक मोहीम

Nasrapur Crime Case : नसरापूर खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर; न्यायालयात एकाच दिवशी दहा साक्षीदारांची साक्ष

Bhandara Crime : "प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग मित्रांना बोलावून बेडरूममध्ये...''; अल्पवयीन तरुणीसोबत भयानक घडलं; पाच जणांना अटक

Pune News : पुणे जिल्ह्यातील आठ धरणांची होणार सुरक्षा तपासणी

SCROLL FOR NEXT