Pune corona update sakal
पुणे

पुण्यात कोरोनाचा विस्फोट; २४ तासात आढळले १६ हजारापेक्षा जास्त रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२१) दिवसभरात १६ हजार ६१८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १० हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील चार मृत्यू आहेत.

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार ३०१ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ५ हजार १८२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार २८९, नगरपालिका हद्दीत ५८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार ४०० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ५६६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ३८९, नगरपालिका हद्दीतील ३४३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील चार मृत्यूबरोबरच पिंपरी चिंचवड व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि नगरपालिका व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८५ हजार २७७ इतकी आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णांलयात २ हजार ७८६ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ८२ हजार ४९१ जण गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT