Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: पुण्यात बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी उद्योजक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्र दगडु गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उद्योजक राजेंद्र गायकवाड हा पीडितेच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेण्याच्या कारणावरून, पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं आणि आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच, आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

पीडित मुलीला धमकी देऊन राजेंद्र गायकवाड हा तेथून पसार झाला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली. तिने हा सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, पीडितेच्या आई-वडीलांनी तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडु गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी राजेंद्र हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT