Pune Crime: काळ्या जादूची घटना; दोन तृतीयपंथीयांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime: काळ्या जादूची घटना; दोन तृतीयपंथीयांना अटक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वैकुंठ स्मशाणभूमीत काल रात्री दोन तृतीयपंथी काही विचीत्र अघोरी कृत्य करत असल्याचं सुरक्षारक्षकाने पाहिले. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

तृतीयपंथी काळ्या बाहुल्या, लिंबू तसेच काही फोटो वापरून अघोरी कृत्य करत होते. तसेच काही मंत्राचाही जप ते करत असल्याचे सांगितले जाते, हे अघोरी कृत्य करणाऱ्यांची नावे लक्ष्मी निभाजी शिंदे (३१) आणि मनोज धुमाळ (२२) असे आरोपींचे नाव असून त्यांना अटक केली आहे.

शिंदे हा मुंबईचा आहेत तर मनोज धुमाळ हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली. स्मशानभूमी मधील सुरक्षारक्षक राऊंड मारण्यासाठी गेले असता त्यांना हे दोघेही आरोपी काळी जादू करताना आढळून आले.

हेही वाचा: MLA Jaykumar Gore Accident : अपक्ष, काँग्रेस ते भाजप; कोण आहेत जयकुमार गोरे

हेही वाच- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यावेळी आरोपींनी काही फोटो त्याबरोबरच लिंबाला लावलेल्या सुया, हळद, शेंदूर यासारखे साहित्य आणून त्यासोबत अघोरी कृत्य करत असल्याचं सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांनाही ताब्यात घेतलं.

त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 च्या अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Pune Newspolicecrime