TET Exam sakal
पुणे

TET Case : डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून शिवकुमार यांना मिळाले पाच कोटी ३७ लाख रुपये

डॉ. प्रितिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. प्रितिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Exam) २०१८ च्या परीक्षेतील गैरव्यवहारात (Non-Behavior) जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख (Dr Pritesh Deshmukh) आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (Ashwinkumar Shivkumar) (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश हरकळ (वय ४२, रा.सिंदखेडराजा, बुलढाणा) यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला देण्यात आले. आश्विनकुमार याने टीईटी -२०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोट रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास ३० लाख रुपये दिले.

सुपे यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात ते नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत असताना त्यांच्या ओळखीचे दीपक सखाराम व्याळीज यांच्या मुलास परीक्षेत पास करण्याकरिता व प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्याने एका अनोळखी व्यक्तीमार्फेत व्याळीज यांच्या मुलाचे हॉल तिकीट घेतले व काम झाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपये देण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांडमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.

आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी :

संतोष आणि हरकळ व अंकुश हरकळ यांचे तपासा दरम्यान त्यांच्याकडून परीक्षार्थींची यादी व पैसे घेतलेल्यांची यादी मिळून आल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात करीत आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी संतोष व अंकुश हरकळ आणि सुपे यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आरोग्य भरती गट-क परीक्षा पेपरफुटीमधील आरोपी अतुल राख याला देखील २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुचविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

बाबो! सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या अभिषेकचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video होताच नेटकरी म्हणाले...

T20 World Cup: इशान किशनवर फायनलपूर्वी कोसळलेला दु:खाचा डोंगर! जगज्जेता झाल्यानंतर केला खुलासा, 'मी तिच्यासाठीच चांगला खेळलो...'

PPF Investment: PPF मध्ये गुंतवणूक फायदेशीर की तोट्याची? टॅक्स बचत आणि रिटर्नचं खरं गणित जाणून घ्या

Mumbai News: मुंबईचा कायापालट होणार! महापौर रितू तावडे यांचा ‘१०० दिवसांचा मास्टर प्लॅन’ तयार

SCROLL FOR NEXT