पुणे

पुणे : पुराव्यांच्या तपासणीसाठी आरोपींनी तज्ज्ञ नेमावा : न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माओवादी संबंध प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या पुराव्यांच्या तपासणी करण्यासाठी आरोपींनी स्वतःचा इलेक्‍ट्रॉनिक तज्ज्ञ नेमावा. संबंधित तज्ज्ञाने क्‍लोन कॉपीबाबत सर्व तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना बुधवारी न्यायालयाने दिल्या आहेत.

पोलिसांनी तपासादरम्यान 25 टेरा बाईट डाटा जप्त केला. मात्र क्‍लोन कॉपीकरून आम्हाला केवळ 10 टेरा बाईट डाटा देण्यात आला आहे. जोपर्यंत पूर्ण डाटा आणि कागदपत्रे आम्हाला देण्यात येणार नाही. तोपर्यंत चार्ज फ्रेम (दोषारोपांची मांडणी) करू नये, असा युक्तिवाद ऍड. सुरेंद्र गडलिंग यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींविरोधात बुधवारी चार्जफ्रेम करण्यात येणार होते. मात्र त्यास ऍड. गडलिंग यांनी विरोध केला आहे. सुधीर ढवळे, ऍड. गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, व्हर्णन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि वरवरा राव यांचा याप्रकरणी नुकताच जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

न्यायवैद्यकीय प्रयोग शाळेकडून आम्हाला दोन हार्ड डिस्क देण्यात आल्या आहेत. त्यात 10 टेरा बाईटच डाटा आहे, असे ऍड. गडलिंग यांनी न्यायालयास सांगितले. पोलिसांनी चार्ज फ्रेमचा आराखडा न्यायालयात दाखल केला आहे. तो पुढील तारखेला मंजूर होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 जानेवारी रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT