Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रूग्णालयातून फरार; पोलीस दलात खळबळ

Pune Crime News : काही दिवसांपुर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

काही दिवसांपुर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रूग्णालयातून पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली. (Pune Crime News)

मार्शल लुईस लीलाकर असे या फरार आरोपीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी याला अटक केली होती. सोशल मिडीयावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी लीलाकारला अटक करण्यात आली होती.

येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला आहे. .फरार असलेल्या लीलाकरचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.

याबाबत स्वाती मोहोळ यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी लीलाकरला काल अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून करण्यात येत होता. तो सध्या सायबर पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला रात्री लॉकअपमध्ये ठेवले होते. लीलाधरने त्याला सकाळी छातीत दुखत असून, अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यामुळे सायबर पोलिसांचे पथक त्याला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी ओपीडीमध्ये उपचारादरम्यान पोलिसांना गुंगारा देऊन त्याने पलायन केले.

काही दिवसांपूर्वीच अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा ससूनमधून आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पलायन केलेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे, असे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT