Sanjay Raut: संजय राऊतांचा धडाका सुरूच! मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो केला शेअर

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो ट्वीट करणाऱ्या संजय राऊत यांनी आजही देखील असाच एक फोटो शेअर केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautEsakal

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो ट्वीट करणाऱ्या संजय राऊत यांनी आजही देखील असाच एक फोटो ट्वीट केला आहे. संजय राऊत यांनी आज सलग ७ वा फोटो शेअर केला आहे. 'पेहचान कौन हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी' असं म्हणत मुख्यमंत्र्यासोबतचा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.(Sanjay Raut again today post photo on Social media )

'टीम मिंधेचे खास मेंबर..काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य!', असं म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार हत्येसारख्या घटना घडत आहेत, त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे.

Sanjay Raut
शेतकरी कुटुंबात जन्मलेला युवक व्हिएतनाममध्ये देतोय योगाचे धडे; महाराष्ट्राच्या गणेशची सातासमुद्रापार भरारी

सामनातून हल्लाबोल

'पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत. महाराष्ट्रातील कंत्राटदार, व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकले आहेत. मंत्रालयात व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड टोळय़ांबरोबर बैठका होतात. हे गंभीर वाटत नाही काय?', असा सवाल त्यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून उपस्थित केला आहे.

Sanjay Raut
Sugar Industry : साखर उद्योग पुन्हा आर्थिक संकटात; मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाला साकडे

'महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचेच राज्य सुरू आहे व त्यास पंतप्रधान मोदी व शहा जबाबदार आहेत. गुंड खुलेपणाने राज्यकर्त्यांना भेटू शकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिवसेनेचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी मारिस या गुंडाने गोळय़ा झाडल्या व हत्या केली. बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज. हा आत्मविश्वास गुंडांना मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांमुळे मिळत आहे!, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
Maharashtra Rain Update : आज राज्याच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस! मराठवाडा-विदर्भासाठी हवामान खात्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com