bhukum.jpg 
पुणे

...म्हणून मुळशी तालुक्यातील 34 जणांवर करण्यात आली कारवाई

राजेंद्र मारणे

भुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आंदगाव येथील तरूणाने वेळीच तपासणी केली नाही. त्यामुळे तो पिंपरी चिंचवड येथील वाय. सी. एम. रुग्णालयात अत्यवस्थ आहे. कडक लाॅकडाऊन असतानाही पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या 30 जणांवर तर घोटावडे ग्रामपंचायतीने चार जणांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. आंदगाव येथील तरूणाने लक्षणे जाणवत असतानाही वेळेत काळजी घेतली नाही. भातलावणी करताना अंगात ताप असताना दोन दिवस तसेच काढले. पिरंगुट येथील खासगी रूग्णालयात गेला असता त्यांनी पौड येथील शासकिय रूग्णालयात जाण्यास सांगितले. तो दुसरे दिवशी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तपासणी केली असता पाॅझिटिव्ह रिपोर्ट आले. दरम्यान, रुग्णालयात जागा उपलब्ध नव्हती. त्याची प्रकृती खालावत होती. त्यास वाय. सी. एम. रूग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यास व्हेंटीलेटरची गरज होती ते एक दिवस मिळू शकले नाही. आज बुधवारी सकाळी त्यास व्हेंटीलेटर उपलब्ध झाले. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याबाबत तालुका वैद्यकिय आधिकारी डाॅ. अजित कारंजकर म्हणाले, त्याच्या कुटूंबातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच परिसर बंद करण्यात येईल. दरम्यान, पश्चिम भागातील ग्रामस्थ मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर व स्वछता पाळणे करत नाहीत. एकत्र येऊन काम करणे, गप्पा मारणे सुरू असते. यामुळे गावागावतून करोना पोहचत आहे.

लक्षणे जाणवू लागल्यास लगेच शासकिय रुग्णालयाशी संपर्क करावा असे आवहान डाॅ. कारंजकर यांनी केले आहे. पोलिसांनी भुगाव, घोटावडे, घोटावडेफाटा, लवळेफाटा येथे तपासणी नाके उभारले असून विनाकारण फिरणाऱ्या 30 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच घोटावडे येथे व्यवसाय सरू ठेवणारे दोघे जण व मास्क लावला नसल्याने दोन जणांवर कारवाई करून पाचशे रूपये दंड घेतल्याचे ग्रामविकास आधिकारी राजाराम काशिलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT