esakal | शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Subhanaji Devkate

मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाच्या सदस्यांनी बारामती येथील कन्हेरी गावात शोधून काढले शिवछत्रपतींच्या सरदाराचे स्मारक. शिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे देवकाते. सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांची ही समाधी संतोष पिंगळे व सुमित लोखंडे या इतिहास अभ्यासक मित्रांनी बारामती तालुक्याच्या कण्हेरी गावात नुकतीच शोधून काढलेली आहे.

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाच्या सदस्यांनी बारामती येथील कन्हेरी गावात शोधून काढले शिवछत्रपतींच्या सरदाराचे स्मारक. शिवछत्रपतींच्या स्वराज्य कार्यात महाराष्ट्रातील अनेक घराणी सामील झाली होती यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे देवकाते. सरदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांची ही समाधी संतोष पिंगळे व सुमित लोखंडे या इतिहास अभ्यासक मित्रांनी बारामती तालुक्याच्या कण्हेरी गावात नुकतीच शोधून काढलेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत माहिती देताना पिंगळे म्हणाले,"स्वराज्यावर आढलेल्या संकटाच्याकाळी असंख्य सरदारांनी साहसी कार्य करून स्वराज्याचे रक्षण केले. तर या सर्व सरदारांना वतने, इनामे व सरंजाम देऊन गौरविण्यात आले होते. त्यात सुभानजी देवकाते यांचाही समावेश होता. त्यांना बारामती तालुक्यातील कन्हेरी, सोनगावसह अनेक गावे इनाम स्वरूपात देण्यात आले होते. स्वराज्याच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये देवकाते यांनी आपले योगदान दिले होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांच्या माहितीनुसार सुभानजी यांचा मृत्यू नोव्हेंबर 1707 मध्ये झाला. तर कन्हेरी गाव त्यांच्या वतनी पाटीलकीचा व सरदारी इनामाचा गाव असल्याने येथे त्यांचे स्मारक तयार करण्यात आले.

लॉकडाऊनने हिरावला हॉटेल चालकांच्या तोंडचा घास; अडीच लाख कामगारांचा रोजगार टांगणीला

अभ्यासादरम्यान समाधीच्या दर्शनी भागात सूर्य, चंद्र व गणपतीच्या प्रतिमा तर इतर बाजूस कमलचिन्हे कोरलेली आढळून आली. तसेच एक शिलालेखही सापडला असून पहिल्या ओळीतील अक्षरे स्पष्ट आहेत तर पुढील ओळी व अक्षरे नष्ट झाली आहेत. मात्र समाधीच्या इतिहासाबद्दल माहिती नसल्याने गावकऱ्यांनी त्याचे महादेवाच्या मंदिरात रूपांतरण केले आहे." दरम्यान याबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने लवकरच या समाधीवरील पुस्तक काढण्यात येणार आहे. असे पिंगळे यांनी नमूद केले.

कल्याणीनगर, खराडी, चंदननगर परिसरात लाॅकडाउनला मिळाला 'असा' प्रतिसाद

"समाधीचे पूर्ण बांधकाम हे घडीव काळ्या पाषाणामध्ये केलेले असून समाधीवर तत्कालीन स्थापत्यशैलीचा पूर्ण प्रभाव जाणवतो त्यातूनच समाधीच्या कळसाची रचना ही घुमटाकार होती. मात्र अलीकडे गावकऱ्यांनी डोक्यावरील घुमट काढून त्या ठिकाणी मंदिराप्रमाणे कळसाची योजना केली आहे."
- सुमित लोखंडे, इतिहास अभ्यासक - मरहट्टी इतिहास संशोधक मंडळ

स्मारक असल्याचा पुरावा
- मंदिरात रूपांतरित झालेल्या समाधीवरती काही ऐतिहासिक राजचिन्हे व एक शिलालेख आढळून आला
- शिलालेखाच्या पहिली ओळीत गुमठ सुभानजी बळवंतराव अशी अक्षरे स्पष्टपणे दिसून येतात 
- समाधीचे बांधकाम घडीव काळ्या पाषाणामध्ये करण्यात आले आहे 
- जमिनीपासून साधारणपणे दोन ते तीन फूट उंचीच्या दगडी चिरेबंदी चौथऱ्यावर समाधी उभी आहे
- चौरसाकृती चौथऱ्याची लांबी साधारणपणे 15 ते 18 फूट

Edited By - Prashant Patil