Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत मविआच्या उमेदवाराबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

रुपेश नामदास

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानी आहे. बँकेने मागील वर्षी ढोबळ नफा ३५१ कोटी ४१ लाख मिळाला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, ज्यावेळ ही निवडणुक लागेल त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी मधील नेते एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा करू, तेथील राजकीय परिस्थिती काय आहे, कोणाची तिथ ताकत आहे.

मागील काळात झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मविआच्या कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत, कोणाचे किती नगरसेवक आहेत. या सगळ्यांवर चर्चा करून या जागेवर निर्णय घेवू" अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधना नंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पोटनिवडणुक जाहीर होण्या आगोदरच पुण्यात भावी खासदार म्हणून भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छूक नेत्यांचे बॅनर लागले होते. राष्ट्रवादीकडून शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यामुळे पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT