Rohit Pawar: राष्ट्रवादीला धक्का! राम शिंदेंकडून रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम

कर्जत बाजार समिती राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का
Rohit Pawar vs Ram Shinde
Rohit Pawar vs Ram Shindeesakal

राज्यात बाजार समिती निवडणुका लागल्या आहेत. अनेक ठिकानी मविआमध्ये फूट पडल्याचे पाहिला मिळत आहे. तर राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केल्याचे देखील पाहिला मिळत आहे. यातच भाजपने राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे, आमदार राम शिंदे हे बाजार समितीच्या निवडणुकीत रोहित पवारांना चितपट करण्यात यशस्वी झाले आहेत.

Rohit Pawar vs Ram Shinde
Liquor : या जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ; राज्याला मिळाला दोन हजार कोटींचा महसूल

आमदार राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षालाच भाजपमध्ये घेत मोठा डाव टाकलाय. त्यामुळे रोहित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत.

आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना आपल्या पॅनेलकडून उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देऊन शिंदे यांनी कर्जत-जामखेडच्या राजकाराणत भूकंप घडविल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar vs Ram Shinde
दिवसभरात देश अन् राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

कर्जत बाजार समिती निवडणुकीसाठी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे. या पॅनेलच्या उमेदवारांची शिंदे यांनी नावे जाहिर केली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांनी काकासाहेब तापकिर यांना सोसायटी मतदारसंघ (सर्वसाधारण) या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र तापकिर यांच्या या धक्क्यानंतर त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे.

सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे बळीराम यादव यांना देखील भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये प्रवेश केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com