All the legislative assembly election in Pune will be fought with full energy says Atul Bahule 
पुणे

पुण्यातील सर्व विधानसभा ताकतीने लढविणार - अतुल बहुले

सकाळवृत्तसेवा

पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली ताकत दाखवून दिली आहे. त्यामुळे पुणे शहर वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक चिंतन बैठक पुणे येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात पार पडली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि उत्साह पाहून पुण्यातील सर्व आठही मतदारसंघ ताकतीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असल्याचे अध्यक्ष अतुल बहुले यांनी जाहीर केले.

त्यामुळे पुणे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्याचाही विचार यावेळी करण्यात आला.

पुणे शहरात सध्या 8 आमदार हे भाजपचे आहेत. परंतु वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या परिसरात वंचित आघाडीचे आणि ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा समुदाय आहे. त्याबरोबरच पुण्यातील काही पेठ आणि वस्त्यांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असल्यामुळे पुण्यात परिवर्तन करण्याची संधी वंचित आघाडीला असल्याची भावना कार्यकर्ते यावेळी बोलून दाखवत होते. या बरोबरच सर्वच समाजाला उमेदवारी देताना सामील करून घेणार असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केल्यामुळे पुण्यात वंचित आघाडी इतिहास घडवण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्यांच्या भावनेतून दिसून येत आहे.

या चिंतन बैठकीचे आयोजन भारीपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले होते. या बैठकीला पुणे शहरातील प्रमुख महिला, युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT