पालखी
पालखी  sakal
पुणे

Ashadhi Wari 2023 : माऊलींच्या विश्‍वरूप दर्शनाची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा

फलटण : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे संस्थानिकांच्या फलटणनगरीत नेहमीप्रमाणेच राजेशाही थाटात दिमाखदार स्वागत झाले. विस्तीर्ण तळावर झालेल्या समाजआरतीत माऊलींच्या विश्वरूप दर्शनाची अनुभूती लाखो भाविकांना बुधवारी(ता.२१) आली.

तरडगावकरांचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सहा वाजता फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. वारकरी हरिनामाचा गजर करीत वाटचाल करीत होते. सकाळी नऊच्या सुमारास काळज येथे सोहळ्याचा पहिल्या विसाव्याला थांबला. तेथे न्याहरी झाली. त्यानंतर पुन्हा सोहळा फलटणच्या दिशेने चालू लागला. पाण्यासाठी टॅंकरमागे वारकऱ्यांची झुंबड उडत होती. वारकऱ्यांना ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचे वाटपही केले जात होते. सुरवडी ओलांडून पालखी सोहळा साडेअकराच्या सुमारास निंबोरे ओढ्यावर थांबला.

तेथे सुमारे दोन अडीच तासांचा जेवणाचा विसावा घेतला. रणरणत्या उन्हातही वारकऱ्यांचा हरिनामाचा गजर कमी झाला नाही. नव्याने केलेला डांबरी रस्ता आणि वरून उन्हाची तिरीप यामुळे वारकऱ्यांना उन्हाचा त्रास जाणवत होता. वडजलजवळ दुपारी विसाव्याला सोहळा थांबला. त्यानंतर सोहळा फलटणमध्ये सहा वाजता प्रवेशला. फटाक्याची आतषबाजी, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि गुलाबपाण्याची शिंपण करीत सोहळ्याने संस्थानिकांच्या नगरीत प्रवेश केला.

ऐतिहासिक राम मंदिराजवळ रथ थांबला तेथे नाईक निंबाळकर घराण्याच्यावतीने पूजन करण्यात आले. तेथे फलटणकर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तेथून सोहळा सायंकाळी सात वाजता विमानतळावर आला.

येथील तळ विस्तीर्ण असल्याने वारकऱ्यांची चांगली सोय होते. येथील समाजआरतीत माऊलींच्या सोहळ्याचे वैभव अनुभवास येते. आरतीनंतर माऊली तंबूत विसावली. सातारा जिल्ह्यातील भाविकांनी फलटणमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT