file photo sakal
पुणे

स्मशानभूमीची राख सावडणार व्हॅक्यूमक्लीनरने

महापालिकेच्या विद्युत विभागाचा प्रस्ताव

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीनंतर कामगारांना हाताने राख गोळा करावी लागते. पण आता शेडमधील राख सावरण्यासाठी व्हॅक्यूमक्लीनरचा वापर केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत, गॅस दाहिनीसह लाकूड व व्हाइट कोलच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जातात.

यामुळे तयारी झालेली राख ही महापालिकेने नियुक्त केलेल्या बिगाऱ्यांकडून वारंवार काढावी लागते. ही राख वेळेवर न काढल्यास प्रदूषणात वाढ होत आहे. वैकुंठ स्मशानभूमीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात रोजी ६० ७५ शवदहन केले जात होते. आता ही कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, पण इतर कारणाने मृत्यू झालेल्या किमान १५ जणांवर अंत्यसंस्कार होतात. (PUNE News)

अंत्यसंस्कारानंतर शेडमध्ये जमा झालेली राख बिगाऱ्यांमार्फत हाताने उचलावी लागते, त्यावेळी राख उडून कर्मचाऱ्यांच्या नाका, तोंडात, कानात जात असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. तसेच राख उचलण्यास उशीर झाल्यास त्याचा परिणाम पुढच्या प्रक्रियेवर होतो.

त्यामुळे इंडस्ट्रिअल व्हॅक्यूमक्लीनरने राख उचलण्याचा प्रस्ताव विद्युत विभागाने तयार केला आहे. राज्य सरकारने १० लाखाच्या आतील कामे निविदा न काढता कोटेशन मागवून त्याद्वारे करता येतील असा आदेश गेल्या महिन्यात काढला आहे. त्यानुसार विद्युत विभागाने यासाठी कोटोशन मागवून ४ लाख ९७ हजार रुपयांचे व्हॅक्युमक्लीनर खरेदी केले जाणार आहे. याप्रस्तावास अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनीही मान्यता दिली आहे.

अर्ध्यातासात स्वच्छता

अंत्यविधीनंतर कर्मचाऱ्यांकडून राख गोळा केली जात असताना त्यास बराच वेळ लागतो, राख उडते. पण व्हॅक्युमक्लीनरच्या सह्याने राख न उडता ती अर्ध्या तासाच्या आत उचलली जाईल व शेडचा भाग देखील स्वच्छ राहील. ही राख गोळा करताना त्यामध्ये हाड जाणार नाहीत अशी व्यवस्थ असणार आहे

‘‘महापालिकेच्या शहरात अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत, तेथे हाताने राख उचलावी लागते. त्याचा त्रास तेथील कर्मचाऱ्यांना होतो, त्यामुळे इंडस्ट्रिअल व्हॅक्यूमक्लीनरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिकतत्वावर याचा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर इतर स्मशानभूमीसाठी विचार केला जाईल.’’

-श्रीनिवास कुंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT