'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल

'तुम्ही मैदानावर खूप घाम गाळला. आपण पदक जिंकू शकलो नाही. पण...'
'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल
ANI

नवी दिल्ली: चुरशीच्या झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनने भारतीय महिला हॉकी संघाचा (India womens hockey team) अवघ्या एका गोलच्या फरकाने पराभव केला. गत रिओ ऑलिंपिकमधील (Rio olympic) सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनने (great britain) हा सामना ४-३ असा जिंकला. ब्राँझ मेडलसाठी (Bronze medal) झालेल्या या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानेही जबरदस्त कामगिरी केली. पण एक गोलच्या निसटत्या फरकाने पराभव पदरी आला.

टोक्योमध्ये सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत प्रथमच भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यफेरी पर्यंत पोहोचला होता. पण उपांत्यफेरीत पराभव झाला. त्यामुळे आज ब्राँझ मेडलच्या सामन्यात महिला हॉकी संघाने जबरदस्त खेळ केला. पण शेवटी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागेल.

'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल
राज ठाकरे इतके बदलतील असं मला वाटतं नाही - बाळासाहेब थोरात

काल पुरुष संघाने पदक विजेती कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला होता. आजही महिला संघ पराभूत झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन करुन त्यांचे कौतुक केले. "तुम्ही मैदानावर खूप घाम गाळला. आपण पदक जिंकू शकलो नाही. पण कोट्यवधी भारतीय महिलांसाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात. मी यासाठी खेळाडू आणि कोचचे अभिनंदन करतो" असे मोदी म्हणाले.

'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल
'एकदिवस लोकलने आणि दुसऱ्यादिवशी भारी गाडीने फिरायचं हे राजकारण झालं'

"पंतप्रधान मोदींनी नवनीत कौरची सुद्धा चौकशी केली. कर्णधार रानी रामपालने तिच्या डोळ्याजवळ चार टाके पडल्याचे सांगितले. "ती चांगली असावी अशी अपेक्षा आहे. वंदनाने खूप चांगला खेळ केला. सवितानेही उत्तम खेळ केला. तुम्ही रडू नका. तुमचं रडणं मला ऐकू येतय. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे आज अनेक दशकांनंतर भारतीय हॉकी चर्चेत आहे" असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नांचे आम्हा सर्वांना कौतुक आहे. खासकरुन हॉकीमध्ये आमच्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवलीय, ते वर्तमान आणि पुढच्या पिढ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे" असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com