bribe crime Sakal
पुणे

बारामतीत सहायक पोलिस उपनिरिक्षकास लाच घेताना अटक

बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तक्रारदाराच्या बाजूने पाठविण्यासाठी 40 हजारांची लाच माळी यांनी मागितली होती.

- मिलिंद संगई

बारामती - पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीस हजारांची लाच स्विकारणा-या संदीपान अभिमान माळी (वय 56) या सहायक पोलिस उपनिरिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. बारामती शहर पोलिस ठाण्यानजिकच सापळा रचून माळी याला पकडण्यात आले. दरम्यान बारामती शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तक्रारदाराच्या बाजूने पाठविण्यासाठी 40 हजारांची लाच माळी यांनी मागितली होती. मात्र तडजोडीनंतर ती 30 हजारांवर आली, हीच लाच स्विकारताना माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलिस निरिक्षक भारत साळुंके, हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकूर, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT