esakal | Bhimashankar : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार
sakal

बोलून बातमी शोधा

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे (ता. आंबेगाव) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुले होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे भविकांबरोबरच, परिसरातील छोटे, मोठे व्यावसायिक तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने शासनाने अखेर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रशासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून त्याबाबत स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, देवस्थानचे विश्वस्त व पोलिस प्रशासन यांनी मंदिर परिसर व काम चालू असलेल्या रस्त्याची पाहणी केली. मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता आणि वाहतूक नियमनाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी पार्किंगच्या सुविधेबाबत पाहणी करून रूपरेषा निश्चित करण्यात आली.

हेही वाचा: पुणे: उत्पन्न वाढीसाठी कमी व्याजदरांच्या ठेवी वाढवा

मंदिर सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून काम चालू असलेल्या रस्त्यापासून मंदिरा पर्यंतचा प्रवास करता येणार असून त्यामधून कोणालाही सूट दिली जाणार नाही. वाहतूक कोंडी बाबत व कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून देवस्थान व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

याप्रसंगी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, सुभाष मोरमारे, पोलिस उपअधीक्षक अनिल लंबाते, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, सतीश डौले आदी उपस्थित होते.

loading image
go to top